भाववाढ विरोधात मेहकरात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:54 AM2018-02-06T00:54:51+5:302018-02-06T00:56:17+5:30

 अनेक समस्या भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून  निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे मंत्री सत्ता सोडायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा आव आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी आंदोलने करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केला.

Bajrangi Morcha protest against inflation! | भाववाढ विरोधात मेहकरात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा!

भाववाढ विरोधात मेहकरात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा!

googlenewsNext
ठळक मुद्देश्याम उमाळकर यांचा आरोप सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात!

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी व सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुसह पेट्रोल, डीझलचे भाव दररोज वाढत आहेत. नोटाबंदी, बाजारामध्ये पिकांना भाव नाही, शेतकर्‍यांना वेळेवर कर्जमाफी मिळाली नाही, नवीन पीककर्ज वेळेवर मिळाले  नाही. यांसह  अनेक समस्या भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून  निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे मंत्री सत्ता सोडायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा आव आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी आंदोलने करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केला.
   पेट्रोल व डीझलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसच्यावतीने ५ फे ब्रुवारी रोजी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, यावेळी श्याम उमाळकर बोलत होते. या मोर्चात  लक्ष्मणराव घुमरे, नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अँड. अनंतराव वानखेडे, नंदकिशोर बोरे, नाजीम कुरेशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार, भुषणभय्या देशमुख, सुरेश मुंदडा, कैलास सुखधाने, शैलेश सावजी, कलीम खान, वसंतराव देशमुख, शैलेश बावस्कर, वसीम कुरेशी, मो.अलीम मो.ताहेर, आश्रुजी काळे, चित्रांगण खंडारे आदी उपस्थित होते. यावेळी विश्रामगृहापासून बैलगाडी मोर्चाला सुरुवात होऊन जानेफळ चौक, जिजाऊ चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गाने मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. 
यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये होऊन लक्ष्मणराव घुमरे, अँड.अनंतराव वानखेडे, आश्रुजी काळे, नंदकिशोर बोरे, वसंतराव देशमुख, कैलास सुखधाने, शैलेश सावजी, देवानंद पवार आदींची भाषणे झाली. संचालन शैलेश बावस्कर यांनी तर आभार शहराध्यक्ष कलीम खान यांनी मानले. त्यानंतर नायब तहसीलदार मीरा पागोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये प्रदीप देशमुख, विनायक टाले, गबाजी गवई, यासीन कुरेशी, डॉ. भरत आल्हाट, अशोक उबाळे, गणेश बोचरे, बाळासाहेब वानखेडे, नामदेव राठोड, राजेंद्र गायकवाड, युनूस पटेल, शंकर सपकाळ, दिलीप बोरे, गणेश अक्कल, नीलेश मानवतकर, संदीप पांडव, आकाश जावळे, केशवराव देवकर, हुसेन गवळी, संदीप ढोरे, विनोद राठोड, वामन मोरे, अंकुश दाभाडे, शेख लतीफ, संजय सुळकर, युसूफ  पठाण, दिलीप खरात, तुकाराम खरात, विलास शेळके, कंवरसिंग चव्हाण, गजानन लोखंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.      

Web Title: Bajrangi Morcha protest against inflation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.