अज्ञात वन्यप्राण्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; ७ जनावरे मृत, ४ जखमी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 06:03 PM2018-07-21T18:03:47+5:302018-07-21T18:04:50+5:30

पातुर्डा (जि. बुलडाणा): येथील भरवस्तीत २० जुलैच्या रात्री अज्ञात वन्यप्राण्याने मेंढ्या व बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. यात ओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या तर काही जनावरे जखमी झाली.

Attack of unknown wild animals; 7 dead, four injured | अज्ञात वन्यप्राण्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; ७ जनावरे मृत, ४ जखमी,

अज्ञात वन्यप्राण्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; ७ जनावरे मृत, ४ जखमी,

Next
ठळक मुद्देओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या. सदर हल्ला दोन वन्यप्राण्यांनी केला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.


पातुर्डा (जि. बुलडाणा): येथील भरवस्तीत २० जुलैच्या रात्री अज्ञात वन्यप्राण्याने मेंढ्या व बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. यात ओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या तर काही जनावरे जखमी झाली. वनविभाग व पशुधन विकास विभागाने याबाबत घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. दरम्यान, तडस या वन्यप्राण्यांनी हा हल्ला केला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
पातुर्डा येथील भरवस्तीत वार्ड क्र.३ मध्ये २० जुलैच्या रात्री काही वन्यप्राण्यांनी गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या व मेंढ्यांवर हल्ला चढवला. सदर हल्ला दोन वन्यप्राण्यांनी केला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. ओंकार बापुना पुंडे यांच्या घराशेजारीच त्यांच्या जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यातील ४ बकऱ्या व ३ मेंढ्या अशी एकूण ७ जनावरे या हल्यात मृत्यूमुखी पडली. ४ जनावरांना किरकोळ जखमा झाल्या. याबाबत ओंकार पुंडे यांनी दिलेल्या माहितीवरुन वनविभागाचे एस.जी. खान व पशुवैद्यकीय अधिकारी ए.ए. पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी ७ जनावरे मृत व ४ जनावरे जखमी आढळली. मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून जखमींवर पातुर्डा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. दरम्यान शेतकºयाने ५ जनावरे बेपत्ता असल्याचे सांगितले. यात शेतकऱ्याचे सुमारे एक लक्ष रुपयाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी ओंकार पुंडे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या माहितीवरुन घटनास्थळाला भेट दिली असता शेळ्या, मेंढ्या अशी ७ जनावरे मृत तर ४ जनावरे जखमी झाल्याचे आढळून आले. तडस नर व मादी या प्राण्यांनी हा हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. नियमानुसार शेतकऱ्याला मदत दिली जाईल.
- एस.जी. खान, वनपरीक्षेत्र अधिकारी, वरवट बकाल

 

Web Title: Attack of unknown wild animals; 7 dead, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.