सिंदखेड राजा तालुक्यात ग्रा.पं.साठी ७७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:53 AM2017-12-27T00:53:51+5:302017-12-27T00:54:39+5:30

सिंदखेडराजा : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान झाले असून, सर्वाधिक वरोडी येथे ९५ टक्के मतदान झाले तर सवडद ग्रा.पं.साठी ८0.५ टक्के मतदान झाले.  

77 percent voting for Village Panchayat in Sindhhed Raja Taluka | सिंदखेड राजा तालुक्यात ग्रा.पं.साठी ७७ टक्के मतदान

सिंदखेड राजा तालुक्यात ग्रा.पं.साठी ७७ टक्के मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देवरोडी येथे सर्वाधिक ९५ टक्के मतदानबुधवारी होणार मतमोजणी  

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान झाले असून, सर्वाधिक वरोडी येथे ९५ टक्के मतदान झाले तर सवडद ग्रा.पं.साठी ८0.५ टक्के मतदान झाले.  
सवडद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवार सरपंच पदासाठी उभे होते. जनतेतून सरपंच निवडल्या जाणार असल्याने मतदारात वेगळाच उत्साह होता. एक-एक मतदान जमा करता करता उमेदवार आणि कार्यकर्त्यांत चांगलीच दमछाक झाली. सवडद येथे ८0.५ टक्के मतदान झाले. वरोडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.भुजंगराव गारोळे यांची प्रा.सदानंद गुंजकर यांच्याशी सरळ लढत झाली. वरोडी आणि शेवगा जहांगीर गट ग्रामपंचायत असताना येथे विक्रमी ९५ टक्के मतदान झाले. मोहाडी येथे व.जा.इंगळे आणि अशोक रिंढे यांची सरळ लढत झाली असून, मोहाडीतही प्रथमच ८८ टक्के मतदान झाले आहे. येथे १३११ पैकी ११४८ मतदारांनी मतदान केले. दरेगाव येथेही ८१ टक्के मतदान झाले आहे. नसिराबाद आणि पांग्री उगले येथे सरासरी ८१ टक्के मतदान झाले. 
सकाळपासूनच मतदारांनी बुथवर रांगा लावल्या होत्या. दुपारी १२ पर्यंत ५0 ते ५५ टक्के मतदान झाले होते. सवडद येथे वयस्क (वृद्ध) मतदारांचे मतदान कार्यकर्ते किंवा नातेवाईक करीत असल्याने बुथ एजंटांनी आक्षेप घेतला होता. 
पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, २७ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता मतमोजणी सिंदखेड राजा येथे होणार असून, १२ वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होईल. यावेळी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. 

मोताळा तालुक्यात सरासरी ८0 टक्के मतदान
तालुक्यात डिडोळा बु. व गोतमारा या दोन ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरासरी ७९.८८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात होते. बुधवार २७ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता मोताळा तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.     तालुक्यातील डिडोळा बु. ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी सहा तर सदस्यपदासाठी १६ उमेदवार रिंगणात होते. तसेच गोतमारा ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी सात व सदस्यपदासाठी नऊ उमेदवारांनी निवडणूक लढवली. मंगळवारी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत मतदान पार पडले असून, दोन्ही ग्रामपंचायतींसाठी २ हजार ९९७ पैकी २ हजार ३९४ मतदारांनी मतदान केले. यात डिडोळा बुद्रुक ग्रा.पं.साठी ७७.८0 टक्के तर, गोतमारा येथे ८२.४८ टक्के इतके मतदान झाले आहे. डिडोळा येथील १६६७ पैकी १२९७ मतदारांनी मतदान केले. यात ६९५ पुरुष तर ६0२ महिला मतदारांचा समावेश आहे. गोतमारा येथील १३३0 पैकी १0९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ५९0 पुरुष तर ५0७ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार एस.के. डोईफोडे, नायब तहसीलदार एस.एम. चव्हाण, निवडणूक लिपिक एस.ए. कन्नर, सी.पी. भोंबे यांच्यासह सहकारी कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.

लोणार : ८५.५४ टक्के मतदान
लोणार तालुक्यातील सोमठाणा, देऊळगाव वायसा, पार्डी सिरसाट या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ८५.५४ टक्के मतदान झाले. एकूण ४ हजार ३५९ पैकी ३ हजार ५९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. तीनही ग्रामपंचायतमध्ये शांततेत मतदान पार पडले. २६ डिसेंबर रोजी मतदान लोणार तालुक्यातील पार्डी सिरसाट, देऊळगाव वायसा, सोमठाणा या तीन ग्रामपंचायतसाठी मतदान झाले. या तीन ग्रामपंचायतसाठी एकूण ९ बुथवर मतदान घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय पिंपरकर यांनी काम पाहिले. गुरूवारला मतमोजणी होणार आहे.

Web Title: 77 percent voting for Village Panchayat in Sindhhed Raja Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.