उघड्यावर जाणार्‍या ६३ ‘लोटा’बहाद्दरांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:51 AM2017-08-24T00:51:08+5:302017-08-24T00:54:18+5:30

मानोरा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सहा गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणार्‍या ६३ जणांविरूद्ध वाशिम जिल्हा परिषद, मानोरा पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. १२00 रुपये प्रतीव्यक्ती यानुसार ४१ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील दोन व्यक्तींनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर मानोरा पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेमुळे स्वच्छता अभियानाची पायमल्ली करणार्‍यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. 

63 openings in the open! | उघड्यावर जाणार्‍या ६३ ‘लोटा’बहाद्दरांवर कारवाई!

उघड्यावर जाणार्‍या ६३ ‘लोटा’बहाद्दरांवर कारवाई!

Next
ठळक मुद्दे४१ हजार रुपये दंड वसूल उघड्यावर जाणार्‍यांसाठी नाकाबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सहा गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणार्‍या ६३ जणांविरूद्ध वाशिम जिल्हा परिषद, मानोरा पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. १२00 रुपये प्रतीव्यक्ती यानुसार ४१ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील दोन व्यक्तींनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर मानोरा पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेमुळे स्वच्छता अभियानाची पायमल्ली करणार्‍यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. 
 स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संकल्प स्वच्छतेचा  स्वच्छ महाराष्ट्राचा  या अभियानांतर्गत  उघड्यावर हागणदारीस जाणार्‍यांची ग्रामपंचायत पोहरादेवी, उमरी खुर्द, वसंतनगर, माहूली या परिसरात नाकाबंदी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत पोहरादेवीचे सभागृहास तात्पुरत्या स्वरुपात जेलचे स्वरुप प्राप्त झाले होते. जिल्हा परिषद वाशिम व पंचायत समिती मानोरा  यांचेकडून १२ गाड्या पोलिस प्रशासनाच्या ताफ्यासह आजुबाजुच्या परिसरात पहाटे ४ वाजतापासून गस्त घालुन उघड्यावर शौचास जाणार्‍या लोकांना पकडून ग्रामपंचायत पोहरादेवी, कार्यालयात पोलिसांच्या स्वाधीन करीत होत्या. उघड्यावर शौचास जाणार्‍यांकडून  प्रशासनाकडून ६00  ते १२00 पर्यंत ऑन द स्पॉट दंड वसुल करण्यात आला. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत पोहरादेवी अंतर्गत ३२, उमरी खुर्द अंतर्गत १८,  वसंतनगर ५,  माहूली ५, हातना २ ,वाईगौळ १ अशा स्वरुपात ६३ लोकांविरु ध्द  दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. एकुण ४१ हजार ३00 रुपये दंड वसुल करण्यात आला. ग्रा.पं.पोहरादेवी अंतर्गत २ लोकांनी दंड भरण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी पोलिस स्टेशन मानोरा येथे फौजदारी कार्यवाहीकरीता पत्र देण्यात आले. यात जिल्हा परिषद वाशिम प्रशासनाच्यावतीने इस्कापे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी  निलेश राठोड, कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पुर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग कक्षाची चमु  आंबेकर, दुधाटे, श्रृंगारे, सावळकर, सरतापे, अफुने पंचायत समिती मानोरा प्रशासनाचेवतीने गोहाड ,गटविकास अधिकारी नायसे,  चव्हाण, भगत, बैलखेडकर, व्यवहारे, वाघमारे, चिंतावार, सर्व मिनी बिडीओ सर्व ग्रामसेवक बी.आर.सी.कक्ष मानोरा, पोलिस प्रशासनाचयवतीने मळघने ठाणेदार आपल्या ताफ्यासह सकाळी ४ ते ९.३0 वाजेपर्यंत पूर्णवेळ उपस्थित होते.

पाहुण्यांना कर पडली महागात
प्रशासनाच्यावतीने  उघड्यावर शौचास जाणार्‍यांकडून दंड वसूल करण्याची कार्यवाही सुरु असताना २२ ऑगस्ट रोजी कर साजरी करण्याकरिता आलेल्या पाहुण्यांनाही महागात पडले.  पाहुणे उघड्यावर शौचास जाताना पकडल्या गेले. त्यामुळे पाहुणचारासह पाहुण्यांच्या दंडाची रक्कमही भरण्याची वेळ काही  लोकांवर आली.त्यामुळे कर चांगलीच महागात पडल्याची कुजबूज सर्वत्र ऐकावयास येत होती.

Web Title: 63 openings in the open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.