तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ४८ लाख रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:02 AM2017-10-30T00:02:25+5:302017-10-30T00:02:39+5:30

बुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.

48 million poultry farmers grow! | तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ४८ लाख रखडले!

तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ४८ लाख रखडले!

Next
ठळक मुद्देशेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूर

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.
गेल्या वर्षी राज्यात तुरीचे उत्पादन मुबलक झाले होते. राज्य  शासनाने विदर्भ  कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नाफेड  आणि बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शेतकर्‍यांची दहा लाख ४९  हजार २२२ क्विंटल तूर बुलडाणा जिल्हय़ात खरेदी केली होती.  त्यापोटी शेतकर्‍यांना ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार १९ रुपये  राज्य शासनाला अदा करावयाचे होते; मात्र मधल्या काळात ही  रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये ओरड होती. 
राज्य शासनाकडून ही ओरड पाहता जिल्हय़ासाठी ५२९ कोटी  ८५ लाख ७३ हजार रुपयांची ही रक्कम जिल्ह्यास पूर्वीच प्राप्त  झाली असून, त्यापैकी बहुतांश रकमेचे वाटप करण्यात  आल्याचे सूत्रांनी सांगितले. अद्यापही ४८ लाख रुपये शे तकर्‍यांची देणी बाकी आहे; मात्र बँकिंग स्तरावरील पत पुरवठय़ाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम अद्याप शे तकर्‍यांना मिळालेली नाही; मात्र तीही लवकरच शेतकर्‍यांना  मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गतवर्षीचे मुबलक तुरीचे पीक आणि त्यानंतर काही ठिकाणी तूर  खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे तुरीचा मुद्दा राज्यभर  गाजला होता. त्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने पावले उचलत तूर  खरेदीला प्राधान्य दिले होते.
चार ऑक्टोबर २0१७ अखेर जवळपास १३ हजार ६९९  िक्वंटल तुरीच्या खरेदीपोटी शेतकर्‍यांना सहा कोटी ९१ लाख  ८१ हजार ५६६ रुपये अदा करणे बाकी होते; मात्र ही रक्कमही  गेल्या पाच ते सात दिवसापूर्वीच उपलब्ध झालेली  असून,  मार्केटिंग विभागाकडून ती संबंधित बँकांकडे वळती करण्यात  आलेली आहे.

शेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूर
गतवर्षी तुरीचे मुबलक पीक झाल्यामुळे बाजारात मोठय़ा  प्रमाणवर तूर विक्रीस आली होती. त्यामुळे उडणारा गोंधळ व  कमी भावात खरेदी केली जाणारी तूर पाहता राज्य शासनाने थेट  बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत दोन लाख ९४८ क्विंटल तूर खरेदी  केली होती. नाफेड अंतर्गतही मोठय़ा प्रमाणावर तूर खरेदी  करण्यात आली होती. या उपरही सध्या जिल्ह्यात दोन लाख ६0  हजार २९६ क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरात पडून असल्याचा  अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: 48 million poultry farmers grow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.