१५ अवैध सावकार रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:18 AM2017-09-27T00:18:32+5:302017-09-27T00:22:23+5:30

खामगाव: शहरातील अवैध सावकार असलेल्या गावंडे आणि  कबाडे कुटुंबियांविरोधात आठ जणांनी तक्रार दाखल केली. या  तक्रारींच्या अनुषंगाने शहरातील इतर सावकारांविरोधात तक्रार  देण्यासाठी त्रस्त कुटुंबीय सरसावले आहेत. त्यामुळे शहरातील  इतरही १५-१७ सावकार पोलिसांच्या रडारवर असून, एका  तक्रारकर्त्याने दुसर्‍या सावकाराच्या विरोधात तक्रार नोंदविल्याची  माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरातील अवैध  सावकारांचे धाबे दणाणले आहे.

15 illegal moneylenders on the radar! | १५ अवैध सावकार रडारवर!

१५ अवैध सावकार रडारवर!

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध सावकारांची धावपळपोलिसांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव! 

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: शहरातील अवैध सावकार असलेल्या गावंडे आणि  कबाडे कुटुंबियांविरोधात आठ जणांनी तक्रार दाखल केली. या  तक्रारींच्या अनुषंगाने शहरातील इतर सावकारांविरोधात तक्रार  देण्यासाठी त्रस्त कुटुंबीय सरसावले आहेत. त्यामुळे शहरातील  इतरही १५-१७ सावकार पोलिसांच्या रडारवर असून, एका  तक्रारकर्त्याने दुसर्‍या सावकाराच्या विरोधात तक्रार नोंदविल्याची  माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरातील अवैध  सावकारांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील गावंडे आणि कबाडे कुटुंबियांच्या सावकारीला  कंटाळून  एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्मह त्येचा प्रयत्न केला. यात एकाचा मृत्यू झाल्याने, खामगाव शहरात  एकच खळबळ उडाली असून, मंगळवारी एका दुसर्‍या अवैध  सावकाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अन्यायग्रस्त पुढे  सरसावले आहेत. पोलिसांनी अवैध सावकारीचा बिमोड  करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात  आल्यानंतर एकाच दिवशी अवैध सावकारांविरोधात तब्बल सा त जण समोर आले. त्यानंतर मंगळवारीही दोघांनी गावंडे, कबाडे  विरोधात तक्रार नोंदविली, तर एका अन्यायग्रस्ताने दुसर्‍या एका  सावकाराच्या नावे तक्रारीचा पाढा पोलीस स्टेशनमध्ये वाचला.  त्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून शहरातील अवैध  सावकारांची जंत्री तयार करण्यात आली असून, प्राथमिक त पासणीत शहरातील १५ ते १७ अवैध सावकार पोलिसांच्या  रडारवर असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
खामगाव येथील जोहार्ले ले-आऊट भागातील जामोदे कुटुंबा तील तिघा बापलेकांनी अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून  विष प्राशन केले होते. यापैकी अत्यवस्थ असलेल्या नरेंद्र जामोदे  यांचा मृत्यू झाला, तर श्रीराम आणि देवेंद्र जामोदे या बापलेकांवर  अकोला येथे उपचार सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी निर्मला  राजेंद्र कबाडे, प्रकाश रामकृष्ण गावंडे,  सोनल प्रकाश गावंडे,  विजय राजेंद्र कबाडे, अक्षय गावंडे, अक्षय कबाडे यांच्याविरोधा त गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारीदेखील  दोन तक्रारदारांनी  तक्रार नोंदविली असून, पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरो पी असलेल्या निर्मला राजेंद्र कबाडे आणि प्रकाश रामकृष्ण  गावंडे यांच्या शोधार्थ व्यूहरचना केली असून, पहाटेपासून  सायंकाळपर्यंत शहराच्या विविध भागात शोधमोहीम राबविण्यात  आली. 

आणखी दोन तक्रारी
एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर  शहरात उघडकीस आलेल्या सावकारी प्रकरणात मंगळवारी दोन  तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दोन्ही तक्रारी पोलिसांनी चौकशीवर  ठेवल्या असून, यासंदर्भात दस्तवेजांची जुळवा-जुळव सुरू  केली आहे. दरम्यान, मुख्य आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी  मंगळवारी पथक विविध ठिकाणी रवाना केले.

दोघांना २९ पर्यंंत पोलीस कोठडी
अवैध सावकारी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोनल  प्रकाश गावंडे आणि विजय रामचंद्र कबाडे या दोन आरोपींना  मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता,  न्यायालयाने उपरोक्त दोन्ही आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस  कोठडी सुनावली.

पोलिसांसमक्ष फिर्यादींना धमक्या! 
अवैध सावकारीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी  दोन आरोपींना अटक केली. या आरोपींपैकी एका आरोपीने  पोलिसांसमक्ष फिर्यादी महिलांना तक्रार दिल्यास खबरदार म्हणत  ‘पाहून’ घेण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या  महिलांनी पुन्हा बचावासाठी पोलीस प्रशासनाकडे साकडे घा तले. 

अवैध सावकाराची अरेरावी!
व्याजाच्या पैशांची परतफेड केल्यानंतरही गावंडे  आणि कबाडे  सावकार कुटुंबियांकडून अतिरिक्त पैशांची मागणी होत होती. इ तकेच नव्हे तर, देवेंद्र जामोदे यांचा पानठेलाही सावकार  कुटुंबियांनी नोटरी करून नावे केला. त्यामुळे  दबावाखाली  वैफल्य आणि त्रस्त  झालेल्या गावंडे कुटुंबियांपैकी दोन्ही मुलांनी   ‘जीवाचे बरे-वाईट’ करून संबंधित सावकारांच्या नावे चिठ्ठी  लिहून ठेवणार असल्याचेही सांगितले होते; मात्र तरीदेखील  कोणतीही गयावया न करता ‘तुमच्याने जे होते’ ते करून  घेण्याची धमकीही संबंधितांकडून जामोदे कुटुंबियांना देण्यात  आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

उपनिबंधक, पोलिसांची बैठक आज
अवैध सावकाराच्या बळी ठरलेल्या नागरिकांना दिलासा  देण्यासाठी शहर पोलीस व उपनिबंधक कृपलानी यांची  उद्या  बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान,  अवैध सावकारीचे बळी ठरलेल्यांना कायदेशीर मदत देण्याच्या  दृष्टिकोणातून मंगळवारी शहर पोलिसांनी उपनिबंधक  कार्यालयाशी चर्चा केली. यासंदर्भात अवैध सावकारांच्या  जाचाला त्रस्त झालेल्यांना पोलीस प्रशासनाकडून सवरेतोपरी मद त करण्याचा मनोदय शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  यू.के.जाधव यांनी बोलून दाखविला. तथापि, मंगळवारी  पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ सर्च ऑपरेशन राबविले. काही  ठिकाणी झाडा-झडतीही घेण्यात आली; मात्र आरोपी मिळून  आले नाही.

Web Title: 15 illegal moneylenders on the radar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.