बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:30 AM2018-01-03T01:30:31+5:302018-01-03T01:31:57+5:30

बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११  बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसमध्ये मेहकर आगाराच्या सर्वाधिक म्हणजे चार बसचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बसफेर्‍या खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या होत्या.

11 bus crashes in Buldhana district; Loss of 91 thousand | बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान

Next
ठळक मुद्देएसटी बससवर दगडफेक नुकसानात सर्वाधिक बस मेहकर आगाराच्या

बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११  बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसमध्ये मेहकर आगाराच्या सर्वाधिक म्हणजे चार बसचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बसफेर्‍या खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या होत्या.
 कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी  मंगळवारी दगडफेड झाली. या दगडफेकीमध्ये   राज्य परिवहन महामंडळाच्या  बुलडाणा विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण नऊ एसटी बस फोडल्याने जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मेहकर आगाराची मेहकर ते पुणे जाणार्‍या एम.एच. ४0 ए.क्यू. ६२७२ क्रमांकाच्या बसच्या देऊळगाव राजा येथे काचा फोडल्या. मेहकर आगाराचीच पुणे ते मेहकर एम. एच. ४0 एक्यू ६७८६ क्रमांकाची बस देऊळगाव राजा येथे, लोणार ते त्र्यंबकेश्‍वर एम. एच. ४0 वाय. ५७५0 क्रमांकाच्या बसचा समोरचा काच व खिडकी नंदापूर फाट्यावर फोडण्यात आली. लोणार ते पुणे या बसचेही नुकसान झाले. चिखली ते काठोडा (एम.एच.४0 एन.९९२४), मलकापूर ते औरंगाबाद, नळकुंड ते बुलडाणा धावणार्‍या दोन बसचेही नुकसान झाले. अकोला ते नाशिक एम.एच.१४ बी.टी. ३२७४ क्रमांकाची बस पिंप्री गवळी फाट्यावर फोडल्याने १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये मेहकर आगाराच्या बसचे अधिक नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

३३ हजार ६६0 रुपयांचे उत्पन्न बुडाले!
बस फोडल्यानंतर मेहकर व चिखली आगाराच्या एकूण १५ बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. चिखली आगाराच्या १४ बसफेर्‍यांचे १ हजार १0२ कि.मी. अंतर रद्द करण्यात आले. त्यामुळे ३३ हजार ६0 रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर मेहकर आगारच्या एका बसफेरीचे ५२ कि.मी. अंतर रद्द झाल्याने ६00 रुपये उत्पन्न बुडाले, असे मेहकर व चिखली आगाराचे १ हजार १५४ कि.मी. अंतर रद्द झाल्याने ३३ हजार ६६0 रुपयांचे उत्पन्न बुडाले. 

नुकसान झालेल्या ११ बसगाड्या बंद राहणार! 
मंगळवारी झालेल्या दगडफेकीच्या घटना पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रसंगी उद्या बसगाड्या बंद राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोबतच ज्या बसगाड्या लांब पल्ल्यासाठी धावत आहे, त्या आहे तेथेच थांबविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: 11 bus crashes in Buldhana district; Loss of 91 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.