Zarina Khan and Abhinav Shukla's hot scenes were annoyed by 'Little' actress on the small screen! But why? | ​जरीन खान अन् अभिनव शुक्लाचे हॉट सीन्स पाहून नाराज झाली छोट्या पडद्यावरची ‘ही’ अभिनेत्री! पण का?

‘अक्सर2’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चर्चेत कशामुळे तर यातील बोल्ड कंटेन्टमुळे. होय, जरीन खान, अभिनव शुक्ला आणि गौतम रोडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. अभिनव व गौतमसोबत जरीनने या चित्रपटात अतिशय हॉट सीन्स दिले आहेत. या हॉट सीन्सची सध्या भलतीच चर्चा रंगली आहे आणि आता एक वेगळीच खबर आहे. या हॉट किसींग सीन्समुळे छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रूबीना दिलाइक म्हणे नाराज आहे.आता जरीनच्या अभिनव व गौतमसोबतच्या हॉट किसींग सीन्सचा अन् रूबीना दलाइकचा काय संबंध? असा प्रश्न तुमच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर संबध आहे आणि तोही जवळचा आहे. कारण रूबीना ही अभिनव शुक्लाची गर्लफ्रेन्ड आहे. आता हा सगळा मामला तुमच्या लक्षात आला असेलच.बॉयफ्रेन्डच्या या इंटिमेट दृश्यांवर रूबीनाला आक्षेप आहे. ‘अक्सर2’चा अलीकडे रिलीज झालेला ट्रेलर आणि गाणी पाहून रूबीनाचा म्हणे जळफळाट होतोय. या ट्रेलर आणि गाण्यांमध्ये किसींग आणि बोल्ड सीन्सची भरमार आहे. या दृश्यांनी रूबीनाला अपसेट केले आहे. खरे तर आधी रूबीना व अभिनव दोघांनीही असे काहीही नसल्याचे म्हटले होते. पण आता खुद्द अभिनवने खुलासा केला आहे. एका मुलाखतीत अभिनवने सांगितले की, रूबीना माझ्या किसींग सीन्ससंदर्भात कम्फर्टेबल नव्हती. आॅनस्क्रीन किसींग सीन्य थोडे टेक्निकल असतात. याआधीचा माझा चित्रपट आणि टीव्ही सीरिअल्समध्ये मी असे सीन्स दिले आहेत. अनेक लोकांसमोर, कॅमेºयापुढे असे सीन्स देताना फिलींग्स डेव्हलप करण्याची कुठलीही संधी नसते. त्यामुळे अशा सीन्समुळे नाराज होण्याला काहीही अर्थ नाही. पण स्वत: एक अभिनेत्री असूनही रूबीना या सीन्समुळे अपसेट होती. मला यासाठी तिला बरेच समजवावे लागले. तुमचा पार्टनम ट्रेलरमधील इंटिमेट सीन्स पाहून अपसेट झाला असेल तर त्याने चित्रपट पाहणे टाळायला हवे.ALSO READ : ​‘अक्सर2’चे नवे गाणे रिलीज! पाहा, जरीन खान अन् गौतम रोडेची बोल्ड केमिस्ट्री!!

रूबीना दीर्घकाळापासून अभिनवला डेट करतेय. दोघेही अनेक इव्हेंटला एकत्र दिसतात. दोघेही सोशल मीडियावरही एकत्र फोटो शेअर करत असतात. रूबीनाने ‘छोटी बहू’या मालिकेत राधिकाची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या दुसºया सीझनमध्येही रूबीना हिच छोटी बहूच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती ‘शक्ती- अस्तित्व एक एहसास’ या मालिकेत सौम्याची भूमिका साकारते आहे.
Web Title: Zarina Khan and Abhinav Shukla's hot scenes were annoyed by 'Little' actress on the small screen! But why?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.