Zarina Khan again sings Salman Khan's goddess; Read what exactly did Zarina say? | जरीन खानने पुन्हा गायिले सलमान खानचे गोडवे; वाचा जरीनने नेमके काय म्हटले?

सुपरस्टार सलमान खानने इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींना लॉन्च केले. त्यामध्येच अभिनेत्री जरीन खान हिचे नाव आहे. २०१० मध्ये आलेल्या सलमानच्या ‘वीर’ या चित्रपटातून सलमानने जरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. याविषयी बोलताना जरीनने सांगितले की, ‘वीर या चित्रपटाच्या आठवणी अजूनही माझ्या हृदयाजवळ आहेत.’ जरीनने वीर व्यतिरिक्त ‘रेड्डी, हाउसफुल-२’ आणि ‘हेट स्टोरी-३’ या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु तिच्या करिअरमध्ये ‘वीर’ हाच चित्रपट महत्त्वाचा असल्याचे ती समजते. 

याविषयी जरीनने सांगतेय की, आज लोक जर मला ओळखत असतील तर ते केवळ ‘वीर’ हा चित्रपटासाठी. भलेही हा चित्रपट यशस्वी झाला नाही. मात्र या चित्रपटामुळेच मला ओळख मिळाली. या चित्रपटात मी सलमान खानची हिरोईन होती. तीच ओळख आजही माझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरताना दिसत आहे. या चित्रपटाच्या आठवणी नेहमीच माझ्या स्मरणात राहणार आहेत. त्याचबरोबर सलमानही माझ्या नेहमीच आदरस्थानी राहणार, असेही जरीनने स्पष्ट केले. पुढे बोलताना जरीनने म्हटले की, आज मला ज्यापद्धतीने चित्रपटांमध्ये प्रमोट केले जात आहे त्या भूमिका माझ्यासाठी फारशा महत्त्वपूर्ण नाहीत. ‘रेड्डी’मध्ये मी केवळ एका गाण्यात काम केले. ‘हाउसफुल-२’मध्येदेखील बºयाचशा कलाकारांमध्ये माझी छोटीशी भूमिका होती. त्यामुळे लोकांनी मला बघितले की नाही हेसुद्धा मी ठामपणे सांगू शकत नाही. ‘हेट स्टोरी-३’नंतर लोकांनी मला वेगळ्या नजरेने बघण्यास सुरुवात केली. मला असे वाटते की, तुम्ही किती मोठ्या चित्रपटात काम करता त्यापेक्षा तुमची भूमिका किती दमदार आहे, हे महत्त्वाचे आहे. जरीन नुकतीच १९२१ या हॉरर चित्रपटात बघावयास मिळाली. 
Web Title: Zarina Khan again sings Salman Khan's goddess; Read what exactly did Zarina say?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.