Zanhavi Kapoor's first talk about Sridevi's mom! | मॉम श्रीदेवीविषयी बोलतानाचा जान्हवी कपूर पहिल्यांदा व्हिडीओ आला समोर!

दिग्गज अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनाला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी श्रीदेवी यांना त्यांच्या ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मरणोत्तर राष्टÑीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे पती बोनी कपूर दोन्ही मुली जान्हवी आणि खूशी कपूरसोबत ३ मे रोजी दिल्ली येथे उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोनी कपूर यांनी माध्यमांशी संवादही साधला. त्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पहिल्यांदा जान्हवी कपूर मॉम श्रीदेवीबद्दल पत्रकारांशी बोलताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये पहिल्यांदा बोनी कपूर मीडियाशी बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की, ‘एवढा मोठा पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्रीदेवी आज आमच्यासोबत नाही. त्यांच्यानंतर लगेचच जान्हवी म्हणते की, ‘मी आणि खूशी... या भूमिकेसाठी माझ्या आईने कठोर मेहनत घेतली, तिच्या समर्पणवृत्तीला ओळखण्यासाठी मी ज्यूरी सदस्यांचे आभार मानते. हे तिच्यासाठी खूप स्पेशल होते. त्यामुळे आम्हाला आनंद होत आहे की, तिला हा सन्मान दिला गेला. जान्हवी अखेरीस भारत सरकारचेही आभार मानते. 
 

जान्हवीला जेव्हा विचारले जाते की, तू तुझ्या आईला मिस करीत आहेस काय? त्यावर जान्हवी म्हणते की, मी याविषयी बोलू इच्छित नाही. दरम्यान, जान्हवी लवकरच ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटात तिच्या अपोझिट ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. शशांक खेतान यांच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनत असलेला हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Zanhavi Kapoor's first talk about Sridevi's mom!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.