Zaheer Khan and Sagarika Ghatge get married on the day of 'Marriage! | जहीर खान अन् सागरिका घाटगे ‘या’ दिवशी अडकणार विवाहाच्या बंधनात !

क्रिकेटपटू जहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा साखरपुडा होऊन बरेच दिवस झाले असून, ते विवाहाच्या बंधनात केव्हा अडकणार? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सतावत आहे. आता या प्रश्नाचे उत्तर सागरिकानेच दिले असल्याने चाहत्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे. सागरिकाने लग्नाची घोषणा करताना म्हटले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही विवाहाच्या बंधनात अडकणार आहोत. 

लग्नाच्या प्लॅनिंगविषयी सागरिकाने सांगितले की, ‘आम्ही या वर्षीच्या अखेरपर्यंत विवाहाच्या बंधनात अडकणार आहोत. कदाचित त्या अगोदरही आम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकतो, असेही सागरिकाने सांगितले. पुढे बोलताना सागरिकाने म्हटले की, आम्ही काही तारखांची शॉर्टलिस्ट तयार केली आहे. परंतु कुठल्या तारखेला लग्न करायचे याचा निर्णय मात्र अद्यापपर्यंत घेतलेला नाही. 

सागरिका सध्या तिच्या होणाºया पती जहीर खानबरोबर सुट्या एन्जॉय करीत आहे. यावेळी सागरिकाला विचारण्यात आले की, तू लग्नानंतरही चित्रपटात काम करणार आहेस काय? यावर उत्तर देताना तिने म्हटले की, होय सध्या मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. मी भारतात परतल्यानंतर चांगल्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात करणार आहे. प्रोजेक्ट छोटा आहे की, मोठा हे माझ्यादृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही, असे सागरिकाने म्हटले. 

मी मराठी चित्रपटामध्येही काम केले आहे. त्यामुळेच मला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली, असेही तिने सांगितले. दरम्यान, जहीर आणि सागरिकाने साखरपुडा करून बराच कालावधी झाला असून, त्यांनी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. सध्या जहीर क्रिकेटमध्ये फारसा सक्रिय नसला तरी, व्यावसायिक जीवनामुळे तो सध्या व्यस्त आहे, तर सागरिकाही लवकरच काही नव्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. अशात हे दोघे केव्हा लग्नाच्या बंधनात अडकतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 
Web Title: Zaheer Khan and Sagarika Ghatge get married on the day of 'Marriage!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.