श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर बॉलिवूड पर्दापणासाठी एकदम सज्ज आहे. एकेकाळी चाहते श्रीदेवीच्या सौंदर्याने घायाळ व्हायचे. तिच्या एक एक अदांवर जीव ओवाळून टाकायचे. आताश: जान्हवी या वळणावर येऊन पोहोचली आहे. पन्नासी ओलांडलेल्या आईसोबत १९ वर्षांच्या जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातला एक फोटो पाहून तुमच्या तोंडून नकळत ‘WOW’ असे निघाल्याशिवाय राहणार आहे. एका फोटोत श्रीदेवीने पांढºया रंगाचा गाऊन घातलेला आहे तर जान्हवीने सिल्क लहंगा आणि त्याव शिमर टॉप परिधान केलेला आहे. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या या ड्रेसमध्ये माय-लेकींचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. विशेषत: जान्हवीने तर आईलाही मागे टाकले आहे. एकंदर काय तर, जान्हवी तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवण्यास एकदम सज्ज झाली आहे...जान्हवी बॉलिवूड एन्ट्री करणार असल्याची चर्चा वाढल्याने सगळ्यांचीच उत्सूकता वाढली आहे. जान्हवी अलीकडे विमानतळावर दिसली. यावेळी तिच्यात श्रीदेवीची झलक दिसून आली.​जान्हवी लवकरच करण जोहरच्या ‘शिद्दत’मधून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी खबर आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट वरूण धवन असल्याचीही चर्चा आहे.


Web Title: 'You' will say 'WOW'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.