पडद्यावर बिनधास्त आयुष्य जगणारे कलाकार खासगी आयुष्यात मात्र नेहमीच बॉडीगार्डच्या घोळक्यात वावरताना दिसतात. सुपरस्टार सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, महानायक अमिताभ बच्चन यांसारख्या मेघास्टार्सला तर घराबाहेर फेरफटका मारण्यासाठीही बॉडीगार्डचा फौजफाटा सोबत ठेवावा लागतो. आपल्या स्टार्सवर येणारा प्रत्येक वार छातीवर झेलण्यास नेहमीच सज्ज असलेल्या या बॉडीगार्डचे त्यांच्या स्टार्ससोबतचे नाते काही वेगळेच आहे. काहींचे तर अगदी कौटुंबिक नाते निर्माण झाले आहेत. शिवाय आपल्या स्टार्ससोबत नेहमीच झगमगाटात वावरणाºया या बॉडीगार्डची लाइफस्टाईलही पूर्णपणे बदलली आहे. याविषयीचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...सलमान खान - शेरा
बॉलिवूडमध्ये सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील नात्याची नेहमीच चर्चा रंगत असते. सुख-दु:खाच्या काळात नेहमीच सलमानसोबत उभा राहिलेल्या शेराचा इंडस्ट्रीतील रुबाब एखाद्या स्टार्सप्रमाणे आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, ‘मी भाईच्या (सलमान खान) मागे किंवा त्याच्याबरोबर चालत नाही तर नेहमीच त्याच्या एक पाऊल पुढे चालत असतो. जेणेकरून त्याच्यावर येणाºया प्रत्येक संकटाचा अगोदर मला सामना करता यावा.’ शेरा सलमानच्या फॅमिली मेंबरप्रमाणे आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्याच्यावर सलमानच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्याच्यातील प्रामाणिकपणासाठी सलमान त्याला १५ लाख रुपये प्रती महिना देत असतो. म्हणजेच सलमानकडून त्याला वर्षाला दोन कोटी रुपये मानधन दिले जाते. शाहरूख खान - रवी सिंग
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानच्या बॉडीगार्डचे नाव रवी सिंग आहे. रवी नेहमीच शाहरूखच्या सुरक्षेसाठी त्याच्या बाजूला एखाद्या सुरक्षा ढालीप्रमाणे उभा असतो. विशेष म्हणजे सलमानचा बॉडीगार्ड शेरापेक्षाही रवीला शाहरूखकडून अधिक मानधन दिले जाते. शाहरूख रवीला वर्षाकाठी अडीच कोटी रुपये देत असतो. रवीचे शाहरूखसोबत खूपच जिव्हाळ्याचे नाते आहे. आमिर खान - युवराज घोरपडे 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्या सुरक्षेची जबाबदारी युवराज घोरपडे नावाच्या बॉडीगार्डवर आहे. युवराज नेहमीच आमिरच्या सोबत बघावयास मिळतो. आमिर युवराजला वर्षाकाठी दोन कोटी रुपये पगार देतो. युवराज बºयाच काळापासून आमिरच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. अमिताभ बच्चन - जितेंद्र शिंदे
महानायक अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता प्रचंड असून, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: व्याकूळ असतात. घराबाहेर फेरफटका मारण्यासाठीही त्यांना सुरक्षारक्षकांचा फौजफाटा सोबत ठेवावा लागतो. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जितेंद्र शिंदे या बॉडीगार्डवर आहे. जेव्हा बिग बी चाहत्यांच्या गराड्यात असतात, तेव्हा जितेंद्रच त्याच्या चहूबाजूने फिरताना बघावयास मिळत असतो. बिग बी जितेंद्र याला वर्षाकाठी १.५ कोटी रुपये पगार देतात. अक्षयकुमार - श्रेयस ठेले
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार भलेही मार्शल आर्टमध्ये पारंगत असला तरी, त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी श्रेयस ठेले नावाच्या बॉडीगार्डवर आहे. श्रेयस नेहमीच खिलाडी अक्षयसोबत असतो. अक्षयवर कुठलेही संकट येऊ नये म्हणून तो चौकसपणे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आतापर्यंत हाताळत आला आहे. अक्षय श्रेयसला वर्षाकाठी १.२ कोटी रुपये पगार देतो. 
Web Title: You will be shocked to know the salary of Bodyguard, who will protect the King of Bollywood!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.