तारा सुतारियाचा हा अंदाज पाहून तुम्ही देखील पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 11:00 AM2019-05-06T11:00:10+5:302019-05-06T11:02:26+5:30

'स्टुडंट ऑफ द ईयर २' हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच तारा फेमस झाली आहे. तिचा स्टायलिश अंदाज नुकताच कॅमेरात टिपण्यात आला.

You can't miss student of the year 2 fame tara sutaria's airport look | तारा सुतारियाचा हा अंदाज पाहून तुम्ही देखील पडाल तिच्या प्रेमात

तारा सुतारियाचा हा अंदाज पाहून तुम्ही देखील पडाल तिच्या प्रेमात

googlenewsNext
ठळक मुद्देया व्हिडिओत ताराने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली असून पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या लुकमध्ये ती खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे असून तिचा हा व्हिडिओ आजवर अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अभिनेत्री तारा सुतारिया लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तारा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर खूपच चांगले फॅन फॉलॉव्हिंग आहे. 

'स्टुडंट ऑफ द ईयर २' हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच तारा फेमस झाली आहे. तिचा स्टायलिश अंदाज नुकताच कॅमेरात टिपण्यात आला. तिला नुकतेच विमानतळाच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी तिथे काढण्यात आलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ताराने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली असून पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या लुकमध्ये ती खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे असून तिचा हा व्हिडिओ आजवर अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

तारा सुतारियाचा 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट येत्या १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी अहमदाबादला जात असतानाचा विमानातील एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ती प्रचंड घाबरलेली दिसत असून प्रार्थना करत असताना दिसली होती. या व्हिडिओत तारा सुतारिया विमानात डोळे बंद करून आणि हात जोडून प्रार्थना करताना दिसणार आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती पाहायला मिळतेय. ती इतकी का घाबरलेली आहे याचे कारण तारानेच सोशल मीडियाद्ववारे सगळ्यांना सांगितले आहे. तारा सांगते की, 'तिला एअर टर्ब्युलेन्सची भीती वाटते. म्हणून ती प्रार्थना करतेय.'

तारा सुतारिया स्टुटंड ऑफ द इयर 2 या चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रासोबत मरजावाँ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Web Title: You can't miss student of the year 2 fame tara sutaria's airport look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.