बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार यांने त्याच्या ‘रुस्तम’ या सुपरहिट चित्रपटात परिधान केलेल्या नौसेनेच्या वर्दीचा सामाजिक कार्यासाठी लिलाव केला जाणार आहे. या लिलावातून मिळणाºया रकमेचा वापर मानवी कल्याणासाठी केला जाणार आहे. ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी राष्टÑीय पुरस्कार मिळविणाºया अक्षयने गुरुवारी ट्विटवर एक फोटो ट्विट केला. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रुस्तम या चित्रपटात मी परिधान केलेली वर्दी जिंकण्याची संधी. बोली २६ मे रोजी बंद होणार. अक्षयने लिहिले, ‘सर्वांना नमस्कार, मी ही घोषणा करताना उत्साहित आहे की, तुम्ही खºयाखुºया नौसेनेची वर्दी मिळविण्यासाठी बोली लावू शकता. तीच वर्दी जी मी रूस्तममध्ये परिधान केली होती.’यावेळी अक्षयने याबाबतचादेखील खुलासा केला की, लिलावामधून मिळणाºया पैशांचे तो काय करणार? अक्षयने म्हटले की, लिलावामधून मिळणारी रक्कम प्राणी संवर्धन व कल्याणाच्या कार्यासाठी दिली जाणार आहे. बोली लावण्यासाठी --- या वेबसाइटवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.’ दरम्यान, अक्षयला रूस्तमच्या भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेता या श्रेणीत राष्टÑीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा त्याचा पहिलाच पुरस्कार ठरला आहे. 

वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले. हा चित्रपट १९५९ मध्ये घडलेल्या केएम नानावती चर्चित न्यायालयीन प्रकरणावरून प्रेरित आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाल्यास रूस्तम पावरी हा एक प्रामाणिक नौदल अधिकारी असतो. 
Web Title: You can also buy 'Rustom' with the Akyakumar wearing the Navy uniform!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.