You are Anushka Sharma, Virat Kohli at Your Home! 'That' s the angry mother of the young man! | तुम्ही तुमच्या घरी अनुष्का शर्मा, विराट कोहली असाल! ‘त्या’ युवकाच्या संतापलेल्या आईने सुनावली खरीखोटी!

 अनुष्का शर्माच्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून सुरू झालेला वाद अजूनही शमण्याची चिन्हे नाहीत.  अनुष्का पती विराट कोहलीसह आपल्या कारने दिल्लीत प्रवास करत  असताना समोरच्या गाडीतील एका व्यक्तीने रिकामी पाण्याची बाटली बाहेर फेकली होती. हे पाहून चिडलेल्या अनुष्काने त्या गाडीतील युवकाला भररस्त्यात सुनावले होते. याचा व्हिडिओ विराटने  सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही तासांत या प्रकरणात एक  ट्विस्ट आला होता. होय, ज्या व्यक्तिला अनुष्काने सुनावले होते, त्या व्हिडिओतील व्यक्तिनेही अनुष्काला तितकेच खरमरीत उत्तर दिले होते़ अरहान सिंग नामक या व्यक्तिने अनुष्काच्या व्हिडिओचा स्क्रिनशॉट शेअर आपली भूमिका मांडली होती. ‘या पोस्टद्वारे मी कुठलाही फायदा उचलू इच्छित नाही. माझ्या बेजबाबदारपणामुळे जे झाले ते चुकीचेच आहे. मी निष्काळजीपणे प्लास्टिकचा एक तुकडा कारबाहेर फेकला होता. पण अनुष्काने आपल्या कारच्या खिडकीची काच खाली करून माझ्यावर एखाद्या वेड्यागत ओरडणे सुरू केले. मी माझ्या चुकीसाठी माफी मागितली. अनुष्का शर्मा कोहली, तुझी भाषा थोडी सभ्य असतील तर तुझी स्टार म्हणून असलेली उंची कमी झाली नसती. माणसात स्वच्छतेच्या जाणीवेसोबतचं थोडी सभ्यताही असायला हवी. माझ्या कारमधून मी फेकलेला प्लास्टिकचा तुकडा तुझ्या तोंडून निघालेल्या कच-यापेक्षा कमीचं होता, असे या व्यक्तिने अनुष्काला उद्देशून लिहिल् होते. पण हे कमी की काय म्हणून आता या व्यक्तिची अर्थात अरहान सिंगची आई गीतांजली सिंग ही सुद्धा मैदानात उतरली आहे.‘तुम्ही लोकांनी माझ्या मुलाचा चेहरा न लपवता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. आता मला माझ्या मुलाच्या सुरक्षेबाबत चिंता वाटू लागली आहे. तुम्ही माझ्या मुलाची प्रतीमा सार्वजनिकरित्या अशी कशी बिघडवू शकता. तुम्ही तुमच्या घरी, पडद्यावर वा क्रिकेटच्या मैदानात अनुष्का शर्मा व विराट कोहली असाल. पण रस्त्यांवर तुम्ही केवळ सामान्य नागरिक आहात. दुस-याला सुधरवताना थोडी नम्रता बाळगा, असे त्यांनी लिहिले आहे. आता अनुष्का व विराट यावर काय बोलतात, त्याची प्रतीक्षा आहे.

ALSO READ : ​रस्त्यावर प्लास्टिक फेकणा-यास अनुष्का शर्माने दिला दम! त्यानेही दिले असे खरमरीत उत्तर !!
Web Title: You are Anushka Sharma, Virat Kohli at Your Home! 'That' s the angry mother of the young man!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.