यंदा ‘या’ चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिस झाले मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:24 PM2019-03-24T12:24:41+5:302019-03-24T12:28:16+5:30

या वर्षाची सुरुवात बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने दमदार झाली आहे. गेल्या तीन महिन्यात अनेक चित्रपट रिलीज झालेत पैकी सहा चित्रपटांनी तर बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसला मालामाल केले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...

This year, the box office went on sale due to 'these' films! | यंदा ‘या’ चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिस झाले मालामाल!

यंदा ‘या’ चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिस झाले मालामाल!

googlenewsNext

-रवींद्र मोरे
यंदा वर्ष सुरु होऊन तीन महिने झाले आहेत. या तीन महिन्यात बॉक्स ऑफिसवर बऱ्याच स्टार्सने नशिब आजमावले. काही जुने स्टार्स नवा चित्रपट घेऊन आले तर काही नव्या स्टार्सने डेब्यू केला. विशेष म्हणजे या वर्षाची सुरुवात बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने दमदार झाली आहे. गेल्या तीन महिन्यात अनेक चित्रपट रिलीज झालेत पैकी सहा चित्रपटांनी तर बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसला मालामाल केले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...

* उरी: द सर्जिकल स्ट्राइक
विक्की कौशलचा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला अर्थात ११ जानेवारी रोजी रिलीज झाला होता. उरी येथील दहशतवादी हल्यानंतर कशाप्रकारे सर्जिकल स्टाइक करण्यात आले होते हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाचे कलेक्शन दमदार होते. ४५ कोटी बजेटच्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स आॅफिसवर सुमारे २४३.७७ कोटी कलेक्शन केले आहे.

* गली ब्वॉय
रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या 'गली ब्वॉय' चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात रणवीरने रॅपरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा बजेट सुमारे ५० कोटी असून बॉक्स ऑफिसवर सुमारे १३९.३८ कोटी कमाई केली आहे.

* मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी
कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाची सुरुवात बॉक्स ऑफिसवर खूपच संथ होती. या चित्रपटावरुन खूपच वादही झाला. अभिनयाबरोबरच कंगनाने या चित्रपटाचे डायरेक्शनही केले आहे. या चित्रपटाचा बजेट ९५ ते १२५ कोटी सांगण्यात आला असून बॉक्स ऑफिसवर १३२.९५ कोटी कलेक्शन केले आहे.

* लुका छुपी
कार्तिक आर्यन आणि कृति सॅनन स्टारर हा चित्रपट १ मार्च रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहे. या चित्रपटासही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लुका छुपीचा बजेट सुमारे २५ कोटी होता, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ८७.६० कोटी कमाई केली आहे.

* टोटल धमाल
या कॉमेडी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित व्यतिरिक्त अनेक दिग्गज स्टार्स आहेत. या सर्व स्टार्सच्या दमदार कॉमेडीने सर्वांर्ना इंप्रेस केले. या चित्रपटाचा बजेट सुमारे ९० कोटी होता तर बजेट काढून या चित्रपटाने सुमारे २२२.१८ कोटी कमाई केली.

* बदला
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले. हा चित्रपट फक्त १० कोटी बजेटमध्ये बनला आहे. मात्र या चित्रपटाने आतापर्यंत ६९.३९ कोटी कलेक्शन केले आहे. हा चित्रपट ८ मार्च रोजी रिलीज झाला होता.

Web Title: This year, the box office went on sale due to 'these' films!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.