यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 06:00 AM2019-01-02T06:00:00+5:302019-01-02T06:00:02+5:30

खरे तर बॉलिवूडने बºयाच इंटरेस्टिंग विषयांवर काम करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये येणाºया सर्व चित्रपटांमधून बायोपिक्स शैलीत एक मुख्य भाग महिलांवर आधारित बायोपिक्सचा आहे, ज्यात खूपच वेगवेगळ्या पद्धतीच्या कथांचा सहभाग आहे.

This year 'biopsychosis' will be seen! | यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन !

यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन !

googlenewsNext

- रवींद्र मोरे 
बायोपिक्सचा ट्रेंड अजून संपणार नसून आगामी काळातही काही बायोपिक्सची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. खरे तर बॉलिवूडने बऱ्याच इंटरेस्टिंग विषयांवर काम करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये येणाऱ्या  सर्व चित्रपटांमधून बायोपिक्स शैलीत एक मुख्य भाग महिलांवर आधारित बायोपिक्सचा आहे, ज्यात खूपच वेगवेगळ्या पद्धतीच्या कथांचा सहभाग आहे. आज आपण अशाच बायोपिक्सच्या बाबतीत जाणून घेऊया ज्यांत स्त्रीशक्तीचे दर्शन घडणार आहे.
 

* कंगना रणौत  -मणिकर्णिका
कंगणा रणौत  या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ती मुख्य भूमिकाही साकारत आहे. हा चित्रपट झॉँसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित असून कंगणाने राणी लक्ष्मीबाईंची  भूमिका साकारली आहे. राणी लक्ष्मीबाई पहिल्या महिला योद्धा होत्या आणि आपल्या काळात त्यांनी इंग्रजांविरोधात पहिल्या स्वतंत्रता संग्रामाचे नेतृत्व केले होते.   

* दीपिका पादुकोण -छपाक
दीपिका पादुकोण एक धाडसी महिला, लक्ष्मी अग्रवाल यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘छपाक’ या बायोपिक मध्ये दिसणार आहे. लक्ष्मी एक अ‍ॅसिड अटॅक सर्वायव्हर आहे आणि अ‍ॅसिड अटॅक पीडितांच्या अधिकारांसाठी एका कार्यकर्ताच्या रुपात काम करते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.

* रिचा चड्ढा -शकीला
९० व्या दशकाच्या शेवटी अ‍ॅडल्ट चित्रपटात अभिनय केल्याने शकीला ही अभिनेत्री चर्चेत आली होती. याच महिलेवर आधारित बायोपिकमध्ये रिचा चड्ढा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. शकीला नावाच्या या महिलेची कथा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक अग्रणी अभिनेत्री व खºया क्रांतिकारी महिलेवर आधारित आहे. अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक इंद्रजीत लंकेश द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट शकीलाची कथा दर्शविणार असून जिने एका पुरुष प्रधान व्यवयासायात आपल्यापद्धतीने ठसा उमटविला होता. 

* जान्हवी कपूर - गुंजन सक्सेना
जान्हवी कपूर पहिली महिला लढाऊ एव्हिएटर गुंजन सक्सेनाच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. गुंजनने १९९९ च्या कारगिल युद्धात घायाळ झालेल्या सैनिकांना वाचवले होते.  

* श्रद्धा कपूर - सायना नेहवाल 
अमोल गुप्तेंच्या दिग्दर्शनात श्रद्धा भारतीय युवा खेळ आयकॉन सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे. सायनाने आतापर्यंत २३ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय  किताब  जिंकून आंतरराष्ट्रीय  खेळांमध्ये भारताचे नाव उच्चांकापर्यंत नेले आहे.  

* जॅकलिन फर्नांडिस -डेबोरा हेरॉल्ड
या आगामी बायोपिकमध्ये जॅकलिन मुख्य भारतीय सायक्लिस्टची भूमिका साकारणार आहे. डेबोरो एक २३ वर्षीय सायक्लिस्ट आहे जी निकोबार द्वीप समूहाशी संबंधीत आहे. विशेष म्हणजे ती यूसीआई, यूनियन साइकिलिस्ट इंटरनेशनेल प्रतिस्पर्धा मध्ये भाग घेणारी पहिली  भारतीय साइक्लिस्ट आहे. 

Web Title: This year 'biopsychosis' will be seen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.