Yash Raj Kapoor's return to Shahrukh; The only romantic formula for 'Dhoom 4'? | ​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी; ‘धूम4’ की तोच जुना रोमॅन्टिक फॉर्म्युला?

शाहरूख खान आणि यशराज बॅनरचे घट्ट नाते आहे. होय, म्हणून अडीच दशकाच्या काळात शाहरूखने यशराज बॅनरसोबत १० चित्रपट केले आहेत आणि आता त्याची यशराजसोबत ११ व्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे.

होय, ताजी खबर तरी हीच आहे. शाहरूख पुन्हा एकदा यशराजच्या चित्रपटात दिसणार आहे. खबर खरी मानाल तर, शाहरूखने आदित्य चोप्राच्या पुढील चित्रपटासाठी होकार दिलाय. आनंद एल राय यांचा ‘झीरो’ हा चित्रपट पूर्ण होताच शाहरूख यशराजच्या चित्रपटात बिझी होईल. तूर्तास शाहरूखने या चित्रपटाबद्दल फार माहिती उघड केलेली नाही. पण चर्चा अनेक आहेत. होय, एका चर्चेनुसार, शाहरूखने होकार दिलेला हा चित्रपट ‘धूम4’ असू शकतो. कारण एकेकाळी आदित्य चोप्राला तिन्ही खानसोबत ‘धूम’ सीरिज बनवायची होती. आमिरसोबत तिसरा भाग झालाय. आता या सीरिजचा चौथा भाग शाहरूखला घेऊन बनवण्याची आदित्यची योजना आहे. (हा अंदाज खरा ठरला तर ‘धूम5’मध्ये सलमान खानची वर्णी निश्चित मानायला हवी.)
अनेकांच्या मते, शाहरूखने यशराजच्या ज्या चित्रपटाला होकार दिला तो ‘धूम4’नसून वेगळाच आहे. आदित्य चोप्राचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यानुसार, त्याला एका योद्धयाची कथा पडद्यावर आणायची आहे. अनेकांच्या मते, या चित्रपटात शाहरूखची वर्णी लागणार आहे. काहींच्या मते, यशराज शाहरूखसोबत तोच जुना रोमॅन्टिक फार्म्युला घेऊन येतोय. १९९३ मध्ये आलेला ‘डर’ हा यशराजचा शाहरूखने केलेला पहिला चित्रपट. यानंतर अलीकडे रिलीज झालेला ‘फॅन’हा यशराजसोबतचा शाहरूखचा दहावा चित्रपट होता.

ALSO READ : ‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर जात आहे शाहरूख खान; अडीच तासांचे मोजतोय १.६ लाख!

तूर्तास शाहरूख खान ‘झीरो’मध्ये बिझी आहे.शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज व्हीएफएक्सकडे हे काम आहे. शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय.  
Web Title: Yash Raj Kapoor's return to Shahrukh; The only romantic formula for 'Dhoom 4'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.