X Boyfriend Ness Wadia Preity Zinta, Chargesheet charges! | एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया प्रीती झिंटाला करायचा मारपीट, चार्जशीटमध्ये केला आरोप!

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. २०१४ मध्ये घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी नेस वाडियाविरोधात तब्बल पाचशे पानांची चार्जशीट दाखल केली आहे. प्रीतीने तिचा पूर्व पती नेस वाडियाच्या विरोधात गैरवर्तन आणि मारपीट करण्याचा आरोप केला आहे. तब्बल चार वर्षांनंतर पोलिसांनी या प्रकरणी चार्जशीट दाखल केल्याने पुन्हा एकदा प्रीती आणि तिचा पूर्व बिझनेसमॅन पती नेस वाडिया आमने सामने उभे राहिले आहेत. शिवाय पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे नेस वाडियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

३० मे २०१४ रोजी प्रीतीसोबत मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये छेडछाडीची घटना घडली होती. या प्रकरणी प्रीतीने दाखल केलेल्या याचिकेत असे नमूद करण्यात आले होते की, वाडियाने आपल्या टीममधील सहकाºयांसोबत तिकिटावरून गैरवर्तणूक केली. जेव्हा हा सर्व प्रकार प्रीतीच्या लक्षात आला तेव्हा तिने तिचे सीट बदलले होते. हीच बाब वाडियाला खटकली होती. त्याने प्रीतीच्या मित्रांसमोर तिच्याशी गैरवर्तणूक केली होती. प्रीतीने म्हटले होते की, जेव्हा मी वाडियापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हा त्याने माझा हात धरला होता. पोलिसांकडे ही तक्रार नोंदविताना प्रीतीने चार फोटोही त्यांना सोपविले होते. ज्यामध्ये तिच्या डाव्या हाताला जखमा झाल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर नेस वाडियाविरोधात छेडछाड, मारपीट आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडियाविरोधात ३५४, ५०६, ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Web Title: X Boyfriend Ness Wadia Preity Zinta, Chargesheet charges!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.