रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 04:00 PM2019-02-24T16:00:00+5:302019-02-24T16:00:04+5:30

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूई रेसलरची एन्ट्री झालीय.

wwe wrestler saurav gurjar will make his bollywood debut in film brahmastra | रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री

रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री

googlenewsNext

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलर सौरव गुर्जर याची एन्ट्री झालीय. म्हणजेच, सौरव गुर्जर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. 
‘ब्रह्मास्त्र’मध्ये सौरव एका निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सौरवने आपल्या या बॉलिवूड डेब्यू फिल्मबद्दल खुलासा केला होता. माझा हा चित्रपट एक अ‍ॅक्शनपट आहे. यातील सगळे अ‍ॅक्शन सीन्स मी स्वत: करतोय, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.


रणबीर कपूरबद्दलही तो भरभरून बोलला होता. रणबीर कपूरचा एक चांगला कलाकार आहे. त्याने शूटींगदरम्यान माझी खूप मदत केली. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मला मिळाला. माझा पहिला सीनही त्यांच्यासोबत होता. खरे तर यामुळे मी कमालीचा नर्व्हस होतो. पण नंतर सगळे काही ठीक झाले, असेही त्याने सांगितले होते.


 ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. (याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय.)    महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन हेही यात मुख्य भूमिकेत आहेत.   ‘ब्रह्मास्त्र’ाा पहिला भाग नाताळ २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. या आगामी चित्रपटांत रणबीरचा अ‍ॅक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

Web Title: wwe wrestler saurav gurjar will make his bollywood debut in film brahmastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.