World Television Premiere will be the biggest '3 rd'! | 'सबसे बढकर हम 3' या तारखेला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर !

सोनी मॅक्स ही सोनी पिक्चर्स नेटवर्कची (एसपीएन) अव्वल क्रमांकाची हिंदी सिने वाहिनी नितीन रेड्डी आणि मिश्टी चक्रवर्ती यांच्या 'सबसे बढकर हम'  या डब सिनेमासोबत तुमच्या विकेंडची दमदार सुरुवात करण्यास सज्ज आहे. अपघाताने घडणाऱ्या प्रेमाची कथा सांगणाऱ्या या सिनेमात 'प्रेम कुठेही होऊ शकते' हे दाखवण्यात आलं आहे. ए. करुणाकरण दिग्दर्शित 'सबसे बढकर हम 3' हा २०१४ साली आलेल्या चिंदना नी कोसम या हिट तेलगु सिनेमावरून डब करण्यात आला आहे. ही कथा आहे नितीन (नितीन रेड्डी) या आनंदी तरुणाची. नितीनला कसल्याही महत्त्वाकांक्षा नाहीत. एकदा ट्रेनच्या प्रवासात तो नंदिनीला पाहतो आणि या सहप्रवाशाच्या प्रेमात पडतो. नितीनच्या कुटुंबाला त्याच्या लग्नाची घाई झाली आहे.मात्र आपल्यासाठी कोणीतरी आपलं, खास माणूस असतं यावर त्याचा विश्वास आहे. तो पुन्हा एकदा नंदिनीला भेटतो आणि या भेटीनंतर तो पूर्णपणे बदलून जातो. त्याच्या मागणीला प्रतिसाद न देणाऱ्या नंदिनीचे मन जिंकून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो.काही काळाने त्याला कळतं की नंदिनी तिच्या आजोबांसोबत देश सोडून जातेय. यावेळी तो हृदयाची  हाक ऐकतो आणि एका महत्त्वाच्या मोहिमेवर जाणाऱ्या नंदिनीच्या मागे बार्सिलोनामध्ये पोहोचतो. आपले नंदिनीवर किती प्रेम आहे, हे तिला सांगण्यासाठी नितीन तिला भेटू शकेल का? नंदिनीचे मतपरिवर्तन होईल का? या सगळ्या गोष्टी रसिकांना या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
Web Title: World Television Premiere will be the biggest '3 rd'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.