'ठग्‍स ऑफ हिंदुस्‍तान'चा वर्ल्‍ड टेलिव्हिजन प्रीमिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 07:19 PM2019-03-13T19:19:15+5:302019-03-13T19:19:38+5:30

अमिताभ बच्चन व आमीर खान यांचा 'ठग्‍स ऑफ हिंदुस्‍तान' चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे.

World Television Premiere of 'Thugs of Hindustan' | 'ठग्‍स ऑफ हिंदुस्‍तान'चा वर्ल्‍ड टेलिव्हिजन प्रीमिअर

'ठग्‍स ऑफ हिंदुस्‍तान'चा वर्ल्‍ड टेलिव्हिजन प्रीमिअर

googlenewsNext


सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍सचे आघाडीचे हिंदी मूव्‍ही चॅनेल सोनी मॅक्‍स सादर करत आहे 'ठग्‍स ऑफ हिंदुस्‍तान'. हा चित्रपट १७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पाहता येणार आहे. विजय कृष्‍ण आचार्यद्वारे लिखित व दिग्‍दर्शित या महान कलाकृतीमध्‍ये पहिल्‍यांदाच रूपेरी पडद्यावर बॉलिवुडचे दोन सुपरस्‍टार्स अमिताभ बच्‍चन व आमिर खान यांनी एकत्र काम केले आहे. माल्‍टा, थायलंड आणि जोधपूर या नयनरम्‍य ठिकाणी चित्रीकरण करण्‍यात आलेल्‍या या चित्रपटात कतरिना कैफ व फातिमा शेख प्रमुख भूमिकेत आहेत.


'ठग ऑफ हिंदुस्‍तान' चित्रपट ब्रिटीश राज्‍याच्‍या सुरूवातीच्‍या काळाला दाखवतो. या काळात ईस्‍ट इंडिया कंपनी एक विक्रेते म्‍हणून भारतात आली. पण त्‍याऐवजी कंपनीने देशावर सत्‍ता गाजवण्‍यास सुरूवात केली. अशा स्थितीमध्‍ये ''आझाद'' सारख्‍या (अमिताभ बच्‍चन) व्‍यक्‍तीने बंडखोरीचे जीवन निवडले. गुलामगिरीमध्‍ये जीवन व्‍यतित करण्‍यापेक्षा मृत्‍यूचा सामना करणे परवडेल अशी त्‍याची विचारधारा होती. ''फिरंगी'' सारख्‍या (आमिर खान) व्‍यक्‍तींनी फायद्यासाठी आपल्‍या धरतीमातेला विकले. जॉन क्‍लाइव्‍ह आझादला ठार करण्‍यासाठी फिरंगीची निवड करतो. फिरंगी त्‍याच्‍या जीवनातील सर्वात मोठ्या चोराला पकडण्‍यासाठी आणि सर्वात मोठ्या शत्रूचा सामना करण्‍यासाठी जातो.
आमिर खानने सांगितले की, ''मी पहिल्‍यांदा कथानक ऐकले, तेव्‍हाच मला फिरंगी भूमिका आवडली. तो एक विलक्षण व्‍यक्‍ती आहे, जो सतत प्रत्‍येकाला खोटे बोलत असतो. मी खरेतर या भूमिकेमुळेच चित्रपटात काम करण्‍याचा होकार दिला आहे. मला फिरंगी भूमिका खूपच आवडली आणि म्‍हणूनच मी कथानक ऐकल्‍यावर लगेचच चित्रपटात काम करण्‍यासाठी उत्‍सुक होतो.''

Web Title: World Television Premiere of 'Thugs of Hindustan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.