​हम आपके है कौन चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराला मिळत नाहीये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:15 PM2018-08-03T17:15:10+5:302018-08-05T06:30:00+5:30

​हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला खूप चांगला न्याय दिला होता. त्यामुळे आजही हा चित्रपट, या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

The work that is not available to the renowned artist of Yeh Aap Hain Koi | ​हम आपके है कौन चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराला मिळत नाहीये काम

​हम आपके है कौन चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराला मिळत नाहीये काम

googlenewsNext

हम आपके है कौन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखांचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला होता. त्यामुळे आजही हा चित्रपट, या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटात राजेशची भूमिका अभिनेता मोहनिश बहलने साकारली होती. या चित्रपटाच्या आधी मोहनिशने अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. मैंने प्यार किया या चित्रपटातील त्याच्या नकारात्मक भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. पण हम आपके है कौन मध्ये त्याला पहिल्यांदाच सकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्या भूमिकेचे त्याने सोने केले. त्यानंतर तो हम साथ साथ है या चित्रपटातही खूप चांगल्या भूमिकेत झळकला होता.

मोहनिश बहल हा अभिनेत्री नुतन यांचा मुलगा असून तो गेली २० वर्षं बॉलिवूडमध्ये काम करत आहे. मोहनिश सध्या खूपच कमी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. २०१० पासून तो खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकला आहे. क्रिश आणि जय हो वगळता कोणत्याही मोठ्या बजेटच्या चित्रपटात आपल्याला त्याला या दरम्यान पाहायला मिळाले नाहीये. २०१४ नंतर तर तो कोणत्याच चित्रपटात आपल्याला दिसला नाहीये. त्याला काम मिळत नसल्याने तो चित्रपटात खूपच कमी दिसत असल्याचे त्यानेच न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत काही वर्षांपूर्वी म्हटले होते. या मुलाखतीत मोहनिशने सांगितले होते की, काम मिळत नसल्याने मी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मी चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले असे अनेकांना वाटते. पण असे काहीही नाही. मला स्वतःला काम करण्याची इच्छा आहे. पण मला कामच मिळत नाहीये. मला सध्या खूपच कमी भूमिका ऑफर येत आहेत. पण कमी भूमिका ऑफर होत असल्याने कोणत्याही भूमिका स्वीकारायचे हे मला पटत नाही. त्यामुळे चांगले काम असल्याशिवाय काम करायचे नाही असे मी ठरवले आहे. 

मोहनिशने चित्रपटांप्रमाणेच संजीवनी, कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या मालिकामध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता मोहनिशनंतर त्याची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. मोहनिशचा हम आपके है कौन, मैंने प्यार किया, हम साथ साथ है चित्रपटातील सहकलाकार सलमान खानच तिला लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे.  

 

Web Title: The work that is not available to the renowned artist of Yeh Aap Hain Koi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.