बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटातून दिसली महिलांची देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 12:37 PM2019-01-27T12:37:55+5:302019-01-27T12:39:45+5:30

देशाला स्वतंत्र करण्यासाठी महिलांचेही तेवढेच योगदान आहे, जेवढे पुरुषांचे आहे. देशाच्या महिलांनीही आपले बलिदान देऊन देशाला स्वतंत्र करण्यात मोठा हातभार लावला आहे. याच पार्श्वभूमिवर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट बनविण्यात आले आहेत, ज्यातून महिलांची देशभक्ती दिसली आहे.

Women patriotism seen from Bollywood's 'This' movie | बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटातून दिसली महिलांची देशभक्ती

बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटातून दिसली महिलांची देशभक्ती

googlenewsNext

-रवींद्र मोरे 
अलिकडेच २६ जानेवारी रोजी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट , १९४७ रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला होता. देशाला स्वतंत्र करण्यासाठी महिलांचेही तेवढेच योगदान आहे, जेवढे पुरुषांचे आहे. देशाच्या महिलांनीही आपले बलिदान देऊन देशाला स्वतंत्र करण्यात मोठा हातभार लावला आहे. याच पार्श्वभूमिवर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट बनविण्यात आले आहेत, ज्यातून महिलांची देशभक्ती दिसली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... 

* मणिकर्णिका 
नुकताच कंगणा राणौतचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात कंगणाने झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. यात लक्ष्मीबाइंचे शौर्य आणि देशभक्ती दाखविण्यात आले आहे. चित्रपट रिलीज होण्याअगोदरच त्याची खूपच प्रशंसा झालेली आहे. स्वत: राष्टपती रामनाथ कोविंद यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे.  

* राजी
गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘राजी’ चित्रपटाने लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली होती. मेघना गुलजारच्या या चित्रपटात आलिया भट्टने एका अशा महिलेची भूमिका साकारली आहे, जी आपला जीव धोक्यात टाकून देशाची सेवा करते. ती मुलगी परप्रांतात जाऊन सेनासाठी माहिती गोळा करते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कादंबरीवर आधारित आहे.  

* नीरजा
एअर होस्टेज नीरजा भनोट यांच्या जीवनावर आधारित ‘नीरजा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड तोेडले होते. नीरजा देशाची ती मुलगी होती, जिने आपल्या देशवासियांच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव गमविला आहे. नीरजा विमानातील प्रवाशांची मदत आणि संरक्षण करताना आतंकवाद्यांच्या बंदुकीतील गोळ्या लागुन मरण पावली होती. या चित्रपटात नीरजाच्या भूमिकेत सोनम कपूरने आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचे मन जिंकले होती.  

* खेलें हम जी जान से
२०१० मध्ये रिलीज झालेला दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्या 'खेलें हम जी जान से' या चित्रपटात देशभक्ती बघावयास मिळाली. चित्रपटाची कहाणी क्रांतिकारी सूर्य सेन यांच्या नेतृत्त्वात झालेल्या चटगांव विद्रोहावर आधारित आहे. या विरोधात कशीतरी एक महिला सहभागी होते आणि स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान देते. ही भूमिका दीपिका पादुकोणने उत्कृष्टपणे साकारली आहे. 

* लक्ष्य
२००४ मध्ये रिलीज झालेला ‘लक्ष्य’ हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर चालला नाही, मात्र या चित्रपटास नेहमी देशभक्तीच्या चित्रपटात गणला जातो. या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत प्रीति झिंटा होती. प्रीतिने यात एका पत्रकाराची भूमिका साकारली असून जी देश वाचविण्यासाठी सैनिकांसोबत काम करते.   

Web Title: Women patriotism seen from Bollywood's 'This' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.