Winners of National Film Awards await! No one came after a month and a half after getting medal !! | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना विजेत्यांची प्रतीक्षा! दीड महिन्यानंतरही कुणीच आले नाही मेडल घ्यायला!!

गत मे महिन्यात पार पडलेला ६५वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वादांमुळे रंगला होता. १३१ पैकी ६0 विजेत्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकत दांडी मारली होती. सुमारे दीड महिन्यानंतरही हे पुरस्कार कुणी घ्यायला न आल्याने पडून आहेत. ना कुणी ते घ्यायला आलेत, ना सरकारकडून ते त्या त्या पुरस्कार विजेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठला पुढाकार घेतला गेला.
 गेल्या ६४ वर्षांपासून हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्याची परंपरा आहे. पण ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात ही परंपरा मोडीत काढत अखेरच्या क्षणी राष्ट्रपतींऐवजी तत्कालीन केंद्रीयामंत्री स्मृती इराणी आणि   हर्षवर्धन राठोड, सचिव नरेंद्र कुमार सिन्हा यांनी अनेक विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले होते. केवळ ११ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. राष्ट्रपतींऐवजी मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार असल्याने अनेक पुरस्कार विजेते नाराज झाले होते आणि याच नाराजीतून त्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. पुरस्कार न स्वीकारणा-यांमध्ये अनेक कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, कंपोजर्स व टेक्निशियन्स होते. ‘इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याला आमचा विरोध नाही. आमचा इराणींनाही विरोध नाही. मात्र हे राष्ट्रीय पुरस्कार असल्याने ते राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळायला हवेत,’ असे या कलाकारांनी सांगितले होते़ ‘ अन्य पुरस्कार सोहळ्यात आम्ही इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारू पण राष्ट्रीय पुरस्काराचं महत्त्व वेगळ आहे, इतक्या वर्षांच्या परंपरेला छेद देता येणार नाही,’ असे ‘मोहरक्या’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सिनेमाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनी म्हटले होते.

ALSO READ : 65th National Film Awards 2018 : बोनी कपूर, जान्हवी कपूर, अक्षय खन्ना यांनी स्वीकारले पुरस्कार, पाहा फोटो!
Web Title: Winners of National Film Awards await! No one came after a month and a half after getting medal !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.