तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:13 AM2019-07-02T11:13:22+5:302019-07-02T11:14:14+5:30

लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच झायराने बॉलिवूडला अलविदा म्हटले.

will zaira wasim promote for her last film the sky is pink with priyanka chopra | तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार?

तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’, असे झायराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

‘दंगल’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केलीय. गत रविवारी, सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला हा निर्णय जाहिर केला होता. मी अल्लाच्या मार्गावरून भरकटले होते, असे झायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

‘दंगल’ हा झायराचा पहिला सिनेमा होता. २०१६ साली या सिनेमासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झायरा झळकली होती. या सिनेमासाठीही तिला फिल्मफेअरचा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस क्रिटिक्स हा पुरस्कार मिळाला होता. लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच झायराने बॉलिवूडला अलविदा म्हटले. त्यामुळे ‘स्काय इज पिंक’ हा झायराचा अखेरचा चित्रपट असणार आहे. अशात झायरा आपल्या या अखेरच्या चित्रपटाचे प्रमोशन करणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याचे उत्तर लवकरच मिळेल, अशी आशा करूयात.

‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’, असे झायराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे...’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.

Web Title: will zaira wasim promote for her last film the sky is pink with priyanka chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.