Will Bollywood's debut will be made by Sridevi, will she do the other? | श्रीदेवीची लेक जान्हवी करणार बॉलिवूड डेब्यु,तर दुसरी लेक करणार हे काम?वाचा सविस्तर

बॉलिवूडची हवाहवाई गर्ल अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दोन्ही लेकी म्हणजेच जान्हवी आणि खुशी कपूर कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतात. एकीकडे जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याच्या जोरदार चर्चा आहे.दुसरीकडे खुशी कपूरसुद्धा आई आणि बहिणीच्या पाऊलावर पाऊल ठेवणार असल्याचे समोर येतंय.खुशी कपूरने एका डान्स रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन दिल्याच्या बातम्या आल्या होत्या.मात्र या निव्वळ चर्चा असल्याचं नंतर समोर आलं.आता खुशी कपूर मॉडेलिंगमध्ये करियर करणार असल्याची माहिती खुद्द श्रीदेवी यांनी दिली आहे. खुशीला आधी डॉक्टर व्हायचं होतं. डॉक्टरनंतर तिला वकील बनण्याची इच्छा झाली. आता अखेर वकील बनण्याची इच्छा सोडून खुशीने मॉडेलिंगमध्ये करियर करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं श्रीदेवी यांनी म्हटलं आहे. आता मॉडेलिंगनंतर ती सिनेमात येते का, रॅम्प ते बॉलिवूड तिचा हा प्रवास कसा होतो का हे पाहणं औत्सुक्याचं असेल असं श्रीदेवीने म्हटलंय.जान्हवी कपूरनं बॉलिवूडमध्ये एंट्री करायचं सांगून धक्काच दिला होता असं श्रीदेवी सांगायला विसरली नाही.आता खुशीने घेतलेल्या निर्णयामुळेही निश्चिंत असल्याचेही सांगितलंय. जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूड सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहे. आपली मुलं-मुली ज्यावेळी करियरची सुरुवात करतात तो क्षण कोणत्याही पालकांसाठी चिंतेची आणि तितकीच उत्साहाची बाब असते तशी ती आपल्यासाठी ही होती असं श्रीदेवीने एका कार्यक्रमावेळी सांगितलं.श्रीदेवी बॉलिवूडच्या फॅशन आयकॉन म्हणून ओळखलं जातं. मात्र आपण आपल्या लेकींकडून फॅशनबाबत टीप्स आणि सल्ले घेत असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिलीय.नवी पीढी खूप हुशार असून फॅशनची त्यांना जाण आहे.त्यांच्याकडून याबाबत मार्गदर्शन घेण्यात काहीही गैर नसल्याचेही श्रीदेवीने सांगितले. 
Web Title: Will Bollywood's debut will be made by Sridevi, will she do the other?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.