Why was Sonakshi Sinha's bungalow named 'Ramayana'? | सोनाक्षी सिन्हाच्या बंगल्याला का दिले गेले ‘रामायण’ हे नाव?
सोनाक्षी सिन्हाच्या बंगल्याला का दिले गेले ‘रामायण’ हे नाव?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आई-वडिल व भावांसोबत ‘रामायण’मध्ये राहते. अर्थात ‘रामायण’ नावाच्या बंगल्यात. सोनाक्षीच्या आई-वडिलांनी आपल्या बंगल्याचे नाव ‘रामायण’ का ठेवले, हे जाणून घ्यायला तुम्हीही नक्कीच उत्सूक असाल. खरे तर सोना जिथे जाते, तिथे तिला हा प्रश्न विचारला जातो. अलीकडे इंडियन आयडॉलच्या सेटवर सोना यावर बोलली.

 तुमच्या बंगल्याचे नाव ‘रामायण’ का? यामागे काय कहाणी आहे, असा प्रश्न मला नेहमीचं विचारला जातो. आज पहिल्यांदा मी या प्रश्नाचे उत्तर देणार आहे, असे सोना यावेळी म्हणाली. सोनाक्षीने सांगितले की, माझ्या वडिलांच्या तीन भावांची नावे राम, लक्ष्मण, भरत आहेत. माझ्या वडिलांचे नाव शत्रुघ्न आहेत. माझ्या भावांची नावेही लव-कुश आहेत. त्यामुळे आमच्या बंगल्याला आम्हाला ‘रामायण’ हेच नाव समर्पक वाटते. फक्त मी आणि माझी आई आम्ही दोघीच आमच्या घरातील ‘घुसखोर’ आहोत. घराचे नाव ‘रामायण’ असले तरी कधी कधी आमच्या घरात ‘महाभारत’ ही होतेच. मग आम्ही दोघी मायलेकी  ‘महाभारत’ पाहणारे प्रेक्षक ठरतो, असे सोनाक्षी यावेळी म्हणाली.
लवकरच सोनाक्षी ‘यमला पगला दीवाना फिर से’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘हॅपी फिर भाग जाएगी’, ‘कलंक’ आणि ‘दबंग3’मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल.


Web Title:  Why was Sonakshi Sinha's bungalow named 'Ramayana'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.