अभिनेत्री विद्या बालन सध्या ‘वान्टेड’ आहे. अपहरण आणि हत्येच्या आरोपात पोलिसांना ती हवी आहे. दचकलात ना? पण थांबा. असे दचकू नका. ‘कहानी2’चे पहिले पोस्टर आऊट झालेयं आणि यात विद्याला ‘वॉन्टेड गुन्हेगार’ म्हणून दाखवण्यात आले आहे.  


सुजॉय घोष यांनी ‘कहानी’ हा सुपरहिट चित्रपट बनवला होता. आता ते या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येत आहेत. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.२०१२ मध्ये विद्याचा ‘कहानी’ हा शेवटचा सुपरहिट सिनेमा आला होता. या चित्रपटाने ५४ कोटींची कमाई केली होती. गतवर्षी विद्याचा ‘हमारी अधूरी कहानी’ हा सिनेमा आला. पण बॉक्सआॅफिसवर तो तितकाच दणकून आपटला.  यंदा आलेला विद्याचा  ‘तीन’ हा चित्रपटही अपयशी ठरला. या यशानंतर आता विद्याला नव्या हिटची गरज आहे. ‘कहानी2’ विद्याचे नशीब बदलवते वा नाही, ते बघूच..२००५ मध्ये आलेल्या ‘परिणीता’ने विद्याला नवी ओळख मिळवून दिली होती. यानंतर विद्याची प्रमुख भूमिका असलेला ‘लगे रहो मुन्नाभाई’ सुपरहिट ठरला होता. यानंतरचे ‘सलाम ऐं इश्म’, ‘हे बेबी’ हे विद्याचे सिनेमे बॉक्सआॅफिसवर फारसे यश मिळवू शकले नाही. २००६मध्ये आलेल्या  ‘गुरु’मध्ये विद्या सर्पोटिंग रोलमध्ये होती. पण हा चित्रपट लोकांच्या पसंतीत उतरला होता. यानंतर ‘दस कहानियां’, ‘किस्मत कनेक्शन’,‘इश्कियां’ हे विद्याचे सिनेमे आले. पण प्रेक्षकांच्या फारसे पसंतीत उतरले नाहीत. पण २०११ मध्ये आलेल्या ‘दी डर्टी पिक्चर’ने विद्याला यशस्वी अभिनेत्रीच्या यादीत नेऊन बसवले.  यानंतरच्या पुढच्याच वर्षी आलेल्या ‘कहानी’हा विद्याचा चित्रपटही यशस्वी झाला. यानंतर मात्र विद्याची गाडी घसरली ते घसरलीच. लग्नानंतर तिच्या वाट्याला फारसे यश आलेच नाही.  
Web Title: Why is Vidya's 'Wanted'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.