Where is Ranveer Singh getting 'Hi Energy'? | ​रणवीर सिंगला कुठून मिळते इतकी ‘हाय एनर्जी’?

‘पद्मावत’मध्ये एकत्र काम करणारे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे दोघेही सुमारे पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांसोबत जाम आनंदात दिसतात. या आनंदाचे कारण कदाचित रणवीर असावा.  होय, रणवीरने याचे सगळे श्रेय दीपिकाला दिले आहे.
तुला इतकी हाय एनर्जी कुठून मिळते? असा प्रश्न अलीकडे रणवीरला विचारण्यात आला. यावर रणवीरने काय उत्तर द्यावे? तुम्हाला माहितीय का की माझी गर्लफ्रेन्ड कोण आहे? असा प्रतिप्रश्न रणवीरने केला. म्हणजेच, रणवीरने त्याच्या हाय एनर्जीचे सगळे श्रेय दीपिकाला दिले. तसेही दीपिकाच्या कौतुकाची एकही संधी रणवीर सोडत नाही. अगदी अलीकडे दीपिका बॉलिवूड इंडस्ट्रीची नंबर १ हिरोईन असल्याचे रणवीरने म्हटले होते. तिच्यात सुपरस्टार क्वालिटी आहे, असेही तो म्हणाला होता. आता तर रणवीरने आपल्यातील हाय एनर्जीचे श्रेयही दीपिकाला देऊन टाकले आहे.
लवकरच रणवीर व दीपिका लग्न करणार, अशी चर्चा जोरात आहे.  विराट कोहली व अनुष्का शमार्सारखेच  दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या विचारात असल्याचेही कळतेय.  हे डेस्टिनेशन वेडिंग कुठे होईल, तूर्तास याबद्दल ठोस माहिती नाही. पण रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 

ALSO READ : ​तर काय रणवीर सिंग व दीपिका पादुकोणही निवडणार ‘विरूष्का’सारखा ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा पर्याय?

तूर्तास रणवीर ‘गली बॉय’या चित्रपटात दिसणार आहे.   सध्या या  चित्रपटाचे शूटींग धडाक्यात सुरु आहे.  जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो अलीकडे लिक झाले  होते. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटातही रणवीरची वर्णी लागली आहे.
Web Title: Where is Ranveer Singh getting 'Hi Energy'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.