'When Ranveer Met Vaani' | 'When Ranveer Met Vaani'

रणवीर सिंह आणि अभिनेत्री वाणी कपूर ‘बेफिक्रे’ प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आले आहेत. होय, ‘हार्पर बाजार ब्राइड’ या प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हर पेजवर रणवीर आणि वाणीची हॉट पोझ सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. ‘व्हेन रणवीर मेट वाणी’ या नावाने मॅगझीनने हे हॉट फोटोशूट केले. या फोटोशूटचा एक व्हिडिओही इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. यात रणवीर-वाणीचे हॉट व सेक्सी लूकमधील फोटो शिवाय दोघांमधील दंगामस्ती करतानांचे अनेक क्षण आहेत. खरे तर या फोटोशूट इतकाच ‘बेफिक्रे’ही सध्या चर्चेत आहे तो यातील किसींग सीनमुळे. साहजिकच पडद्यावरची रणवीर-वाणीची हॉट केमिस्ट्री पाहून हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असे प्रेक्षकांना झाले आहे.


Web Title: 'When Ranveer Met Vaani'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.