... when the contract was held near the superstar Salman Khan | ...जेव्हा डान्सिंग अंकलने सुपरस्टार सलमान खानसमोर धरला ठेका

आठवडाभरापूर्वी रातोरात प्रसिद्धीझोतात असलेल्या डान्सिंग अंकलची क्रेझ अजूनही लोकांमध्ये कायम आहे. बºयाचशा वर्षांपूर्वी एका लग्नात डान्स केल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे आज डान्सिंग अंकल प्रसिद्धीझोतात आले. डान्सिंग अंकल, डब्बूू अंकल या नावाने ओळखल्या जाणाºया संजीव श्रीवास्तव यांना आता तर बॉलिवूड चित्रपटांच्याही आॅफर मिळू लागल्या आहेत. 

नुकतेच संजीव यांना सुपरस्टार सलमान खानच्या ‘दस का दम’ या शोमध्ये आमंत्रित केले होते. शोमध्ये त्यांनी असा काही ठेका धरला की, उपस्थितानाही थिरकायला भाग पाडले. हे सर्व बघून सलमान दंग राहिला. नुकताच ‘दस का दम’चा नवा प्रोमो समोर आला. ज्यामध्ये डान्सिंग अंकल थिरकताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांची पत्नीही नाचत आहे. सलमानदेखील डब्बू अंकलचा डान्स एन्जॉय करीत आहे. डब्बू अंकलने हा प्रोमो त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरही शेअर केला आहे. संजीव श्रीवास्तव भोपाल येथील भाभा इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे सहायक प्राध्यापक आहेत. नुकतेच विदिशा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने त्यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर घोषित केले. संजीव यांच्या डान्सचे स्वत: गोविंदानेही कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने डब्बू अंकलचा डान्स बघून त्यांना मुंबईमध्ये आमंत्रित केले होते. वृत्तानुसार, सुनील शेट्टीने त्यांना ‘हेराफेरी-३’मध्ये एक भूमिका आॅफर केली आहे. 

याव्यतिरिक्त F the Couch या त्याच्या जाहिरातीच्या कंपनीतही त्यांना कास्ट करण्याचा सुनील शेट्टी विचार करीत आहे. डब्बू अंकलला यापूर्वीच बजाज इन्श्युरन्स कंपनीने साइन केले आहे. वाढत्या लोकप्रियतेमुळे डब्बू अंकल इतके वैतागले की, त्यांनी त्यांचा फोन भावाला दिला आहे. आता संजीव अंकल आपल्या डान्सच्या अदा बॉलिवूडमध्ये दाखविणार काय? याबाबत उत्सुकता आहे. 
Web Title: ... when the contract was held near the superstar Salman Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.