When the BJP government in Karnataka, Prakash's | कर्नाटकात भाजपा सरकार पडताच प्रकाश राजने मोदींवर साधला निशाणा!

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणारा अभिनेता प्रकाश राज याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये सत्तेचे वारे फिरताच प्रकाश राजने विरोधाचा सूर आवळताना मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. वास्तविक प्रकाश राज सुरुवातीपासूनच मोदी सरकारविरोधात टीकेची झोड उठवित आले आहेत. ट्विटच्या माध्यमातून ते आपला रोष व्यक्त करतात. यावेळेसदेखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातूनच मोदींवर निशाणा साधला आहे. 

प्रकाश राज इंडस्ट्रीतील त्या लोकांपैकी आहेत, जे देशाच्या राजकारण बिनधास्तपणे आपले मत मांडतात. यावेळेस त्यांनी कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरून भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोडी उठविली आहे. ज्यामुळे प्रकाश राज पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. प्रकाश राजने ट्विटमध्ये म्हटले की, ‘कर्नाटक भगवा होणार नाही; मात्र रंगीत कायम राहणार. खेळ सुरू होण्याअगोदरच संपला. ५६ इंच विसरा ५५ तासही कर्नाटक सांभाळू शकले नाहीत. प्रिय नागरिकांनो आता घाणेरड्या राजकारणासाठी तयार राहा. मी नागरिकांसाठी नेहमीच उभा राहणार.’ या ट्विटच्या अखेरीस प्रकाश राजने हॅशटॅग करून इंग्रजीमध्ये ‘जस्ट आस्किंग’ असेही लिहिले. 
 }}}} ">KARNATAKA is not going to be SAFFRON...but will continue to be COLOURFUL....Match over before it began...forget 56 couldn’t hold on for 55 hours..jokes apart...dear CITIZENS now get ready for more muddy politics..will continue to stand for the CITIZENS and CONTINUE #justasking..

— Prakash Raj (@prakashraaj) May 19, 2018
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर जबरदस्त राजकीय घमासान बघावयास मिळाले होते. कर्नाटकच्या जनतेने एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्याने प्रचंड राजकीय गोंधळ बघावयास मिळाला. निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने, कॉँग्रेस आणि जेडीएसने मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र यादरम्यान, भारतीय जनतेला जो राजकीय खेळ बघावयास मिळाला, त्यावरून ही लोकशाहीची थट्टा तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला गेला. 

दरम्यान, याअगोदरही प्रकाश राजने ट्विटरवर लिहिले होते की, ‘कर्नाटक ब्रेकिंग न्यूज...!!! हॉलिडे रिसॉर्टचे मॅनेजर महामहिम राज्यपालांना भेटत असून, सरकार स्थापन करण्याचा दावा करीत आहेत. कारण त्यांच्याकडे ११६ आमदार आहेत. खेळ आता सुरू झाला आहे. कोणीही राजकारणाचा आधार घेणार नाही.’ दरम्यान, प्रकाश राजने कर्नाटकमध्ये निवडणुकीदरम्यान भाजपाविरोधात एक कॅम्पेन चालविले होते. ज्यामध्ये त्यांनी कर्नाटकच्या जनतेला भाजपाला मत न देण्याचे आवाहन केले होते. 
Web Title: When the BJP government in Karnataka, Prakash's
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.