When Amitabh Bachchan's children asked Jackie Shroff for autograph; Shared Interesting Anecdote! | जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या मुलांनी जॅकी श्रॉफकडे मागितला होता आॅटोग्राफ; शेअर केला मजेशीर किस्सा!

९० च्या दशकात पडद्यावर राज करणारे अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नुकताच एक असा अनुभव सांगितला ज्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. त्यांनी म्हटले की, मेगास्टार अमिताभ बच्चन यांची मुले जेव्हा माझ्याकडे आॅटोग्राफ मागण्यासाठी आली तेव्हा मला जाणीव झाली की, मी आता लोकप्रिय होत आहे. ६३ वर्षीय जॅकीदाने म्हटले की, ‘मी चेन्नईमध्ये शूटिंग करीत होतो अन् बच्चन यांनी एका पंचतारांकित हॉटेलचा वरचा पूर्ण मजलाच भाड्याने घेतला होता. मीदेखील त्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो. जॅकीदाने म्हटले, ‘मी वेटरला विचारले की, ते (अमिताभ बच्चन) कोणत्या वेळेत येणार आहेत? कारण मला त्यांना भेटायचे आहे. मात्र सगळे उलट घडताना दिसले. कारण त्यांची मुलेच माझ्याकडे आॅटोग्राफसाठी आली होती. 

जॅकीदाने पुढे सांगितले की, मी म्हटले वाह... मी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांची या ठिकाणी प्रतीक्षा करीत आहे अन् त्यांची मुलेच माझ्याकडे आॅटोग्राफसाठी आली आहेत. तेव्हा मला याची जाणीव झाली की, मीदेखील आता प्रसिद्ध झालो आहे. दक्षिण मुंबईतील एकेकाळी एका चाळीत राहणाºया जाकीदाने म्हटले की, ‘मी कधीच विचार केला नव्हता की, मी एक अभिनेता होईल. मात्र माझ्या वडिलांना सुरुवातीपासूनच विश्वास होता की, मला माझ्या आयुष्यात एक चांगली गोष्ट मिळणार आहे. 
 }}}} ">When power speaks, everyone listens. Here's the new #PhamousPoster. Trailer out today! pic.twitter.com/8W0621FEz8

— Jackie Shroff (@bindasbhidu) April 26, 2018
दरम्यान, जॅकीदा आगामी ‘फेमस’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण ललित भूटानी यांनी केले आहे. त्यांचा हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जिम्मी शेरगिल, के. के. मेनन आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
Web Title: When Amitabh Bachchan's children asked Jackie Shroff for autograph; Shared Interesting Anecdote!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.