या भीतीपोटी नेहा धूपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 09:35 PM2018-09-21T21:35:44+5:302018-09-21T21:38:52+5:30

नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण आता एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले.

what was the reason for concealing the pregnancy neha dhupia revealed | या भीतीपोटी नेहा धूपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी!!

या भीतीपोटी नेहा धूपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी!!

googlenewsNext

 बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांच्या अचानक लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कुणाला कानोकान खबर न होऊ देता, अंगद व नेहाने लग्न उरकले.  गत १० मे रोजी  दिल्लीच्या गुरूद्वारात दोघांचेही लग्न झाले. या लग्नाला नेहा व अंगदच्या जवळचे अगदी मोजके काही लोक उपस्थित होते. अचानक झालेल्या या लग्नानंतर एक वेगळीच चर्चा रंगली. ती म्हणजे, नेहा लग्नापूवीर्चं प्रेग्नंट असल्याची. प्रेग्नंसीमुळेच नेहा व अंगदने घाईघाईत लग्न उरकले, असेही मानले गेले. पण नेहा व अंगद दोघांनीही या बातमीचा इन्कार केला. दोघांच्या घरच्यांनीही या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले. पण पुढे  लपवणे अशक्य झाले तेव्हा कुठे अंगद व नेहाने प्रेग्नंसी जाहिर केली. अंगद व नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण आता एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले.
होय, मिड डेला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली की, सुरूवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर मला काम देणे बंद तर करणार नाही, अशीही भीती मला होती. एक चांगली गोष्ट म्हणजे, सुरूवातीच्या सहा महिन्यांपर्यंत माझे बेबी बम्प दिसले नाही. याचा मला फायदा झाला. माझी एनर्जी लेवल खूप चांगली आहे. मी यादरम्यान ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल्ड बाय नेहा’चे शूटींग संपवले.
नेहा धूपिया आणि अंगद बेदीने लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये रॅम्पवॉक केला होता. बेबी बम्पसोबत तिचा हा पहिला रॅम्पवॉक होता. हा ट्रेंड करिना कपूरने सेट केला होता. नेहाने त्याचाच कित्ता गिरवला.

Web Title: what was the reason for concealing the pregnancy neha dhupia revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.