WHAT ?? TIMUR ALI KILLER A NORTH JUNGLE AT BURED DE GIFT !! | WHAT??​ तैमूर अली खानला बर्थ डे गिफ्ट म्हणून मिळालं एक अख्ख जंगल!!
WHAT??​ तैमूर अली खानला बर्थ डे गिफ्ट म्हणून मिळालं एक अख्ख जंगल!!
पतौडी घराण्याचा छोटा नवाब तैमूर अली खानचा पहिला वाढदिवस काल २० डिसेंबरला धूमधडाक्यात साजरा झाला. तैमूरच्या या वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खान आणि कपूर घराण्याच्या अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित तैमूरचा वाढदिवस साजरा झाला. पण तरिही तैमूरला वाढदिवसाचे काय काय गिफ्ट्स मिळालेत, याची उत्सुकता तर असणारच. तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पहिल्या वाढदिवसाला तैमूरला एक खास गिफ्ट मिळालेयं. असे गिफ्ट की त्याची कुणी कल्पनाही केली नसावी. होय, तैमूरला एक जंगल भेट म्हणून मिळालेयं. हो, तुम्ही वाचले ते अगदी बरोबर आहे. मुंबईपासून ५० किमी दूर सोनावेमधील एक लहानसे जंगल करिनाची न्युट्रिशियन ऋजुता दिवेकर हिने तैमूरला  भेट  दिले आहे.ऋजुताने स्वत: इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली आहे. सोबत तैमूर अली खान पतौडी जंगलाचा एक खास फोटोही शेअर केला आहे. तैमूरला भेट म्हणून मिळालेले जंगल १००० चौरस फूट जमिनीवर पसरलेले आहे. यात १०० वेगवेगळी झाडं लावण्यात आली आहेत.  कुठल्याही लहान मुलाला पक्षी,मधमाशा, फुलपाखरे पाहणे आवडते. त्यामुळे मी विधि पक्षी व फुलपाखरांनी भरलेले एक लहानसे जंगल तैमूरला बर्थ डे गिफ्ट म्हणून दिले आहे. तैमूर मोठा होईल, तेव्हा या जंगलात बहरलेले वृक्ष पाहून आनंदीत होईल, अशी आशा करते, असे ऋजुताने लिहिले आहे. या जंगलात ३ जांभळाची,  १ फणसाचे,१ आवळ्याचे, ४० केळींची, १४ शेवग्याची अशी अनेक झाडे आहेत. याशिवाय सीताफळ, रामफळ, नींबू या फळझाडांसह मिरची, हळद, लसूण आणि अनेक फुलांची शेती आहे. तैमूरला भेट म्हणून मिळालेल्या या जंगलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते झिरो बजेट अर्थात नैसर्गिक शेतीच्या कल्पनेतून प्रेरणा घेऊन साकारण्यात आले आहे. ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या ‘झिरो बजेट’ या कल्पनेतून प्रेरणा घेत ऋजुताने हा सामुहिक शेतीचा प्रकल्प सुुरू केला आहे. यात तुम्ही स्वत:च्या नावावर वनशेती घेऊ शकता आणि त्यावर शेतीही करू शकता.

ALSO READ :  तैमूरने असा कापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाचा केक !

काल पतौडी पॅलेसमध्ये तैमूरचा वाढदिवस साजरा झाला. तैमूरचे पापा मम्मी सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्यासह शर्मिला टागौर, रणधीर कपूर,बबीता, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, नताशा पूनावाला, करण कपूर असे सगळे या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
Web Title: WHAT ?? TIMUR ALI KILLER A NORTH JUNGLE AT BURED DE GIFT !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.