what shraddha kapoor bans boyfriend rohan shrestha from working her ex boy friend farhan akhtar | फरहान अख्तरपासून दूर राहा...! श्रद्धा कपूरने बॉयफ्रेन्डला बजावले!!
फरहान अख्तरपासून दूर राहा...! श्रद्धा कपूरने बॉयफ्रेन्डला बजावले!!

ठळक मुद्देफरहान व शिबानीचे रिलेशनशिप जगजाहिर झाले आहे. पण श्रद्धा व रोहन या दोघांनी आपले नाते अजूनही जगापासून लपवून ठेवले आहे.

अभिनेता फरहान अख्तर सध्या शिबानी दांडेकरच्या प्रेमात वेडा झालाय. कधीकाळी याच फरहानच्या हृदयात श्रद्धा कपूर बसली होती. होय, फरहान व श्रद्धाच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. श्रद्धाने फरहानसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवस ती फरहानसोबत लिव्ह इनमध्ये होती. अर्थात श्रद्धा वा फरहान या दोघांपैकी कुणीच कधीच आपले नाते जगापुढे मान्य केले नाही. पुढे तर दोघांचे ब्रेकअपचं झाले. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आणि नंतर दोघेही आपआपल्या वाटेने चालते झाले. या वाटेवर फरहानला शिबानी मिळाली तर श्रद्धाला रोहन श्रेष्ठा.

यापैकी फरहान व शिबानीचे रिलेशनशिप जगजाहिर झाले आहे. पण श्रद्धा व रोहन या दोघांनी आपले नाते अजूनही जगापासून लपवून ठेवले आहे. आता या नात्यात एक नवा ट्विस्टआला आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, श्रद्धाने म्हणे रोहनला फरहानपासून दूर राहण्याचे बजावले आहे. होय, एका कॅम्पेनसाठी रोहनला फरहानसोबत काम करायचे होते. पण रोहनने म्हणे यासाठी नम्र नकार कळवला. या नकारामागे अर्थात श्रद्धा हेच कारण होते.

करणच्या दिवाळी पार्टीतही रोहन फरहानला टाळताना दिसला होता. या पार्टीत फरहान व शिबानी एकत्र पोहोचले होते. पार्टीत श्रद्धा व रोहन दोघेही होते. पण फरहान व शिबानीने पार्टीत एन्ट्री घेताच श्रद्धा व रोहन दोघांनीही तिथून काढता पाय घेतला होता. रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे.  वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहननेही फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे.


Web Title: what shraddha kapoor bans boyfriend rohan shrestha from working her ex boy friend farhan akhtar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.