What is Rakhi Sawanti's response to Asaram's punishment? | आसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया?, जाणून घ्या!

अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म केल्याप्रकरणी स्वयंघोषित बाबा आसाराम बापू याला जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आसारामच्या शिक्षेचा निर्णय समोर येताच ड्रामा क्वीन राखी सावंत हिने आनंद व्यक्त केला. मात्र त्याचबरोबर या व्यभिचारी व्यक्तीला फाशीची शिक्षा का झाली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला. राजस्थान, जोधपूर स्थित आपल्या आश्रमात २०१३ साली आसारामने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. गेल्या बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आसारामला दोषी ठरवित त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

याविषयी राखीने म्हटले की, ‘मला खूपच आनंद झाला आहे की, आसारामला कठोर शिक्षा ठोठावण्यात आली. अशाप्रकारची वृत्ती असलेल्या लोकांसाठी न्यायालयाने मोठा धडा दिला आहे. विशेषत: जे लोक श्रीमंती आणि ताकदीच्या जोरावर महिला आणि मुलींचे शोषण करतात त्यांच्यासाठी हा खूप मोठा धडा आहे.’ पुढे बोलताना राखीने म्हटले की, ‘याप्रकरणी आसारामला फाशीची शिक्षा का नाही सुनावली? मुलगी अल्पवयीन होती. लहान मुलांसोबत दुष्कर्म करणाºयांना बेल तर दिली जाऊच नये, शिवाय त्यांना आयुष्यही जगू देऊ नये. दरम्यान, निर्माता प्रीतीश नंदीने ट्विट करून म्हटले की, आता न्याय झाला. अखेर आसारामला अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म केल्याबद्दल शिक्षा झाली. अभिनेता तथा निर्माता फरहान अख्तरने म्हटले की, ‘आसाराम मुलींसोबत दुष्कर्म करणारा व्यक्ती असून, त्यात तो दोषी आढळला आहे. त्यामुळे लोकांनी पंतप्रधान मोदींसोबतचा त्याचा फोटो शेअर करणे थांबवायला हवे. एका फोटोमध्ये मोदी आसारामसोबत दिसत आहेत. 
Web Title: What is Rakhi Sawanti's response to Asaram's punishment?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.