What is the name of Kapil Sharma's new show? | कपिल शर्माच्या नव्या शोचे नाव काय?

कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परततो आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. काही दिवसांपूर्वी कपिलच्या या नव्या शोचा प्रोमो रिलीज झाला होता. यात कपिल ‘सोनी’च्या आॅफिसात जाण्यासाठी आॅटो शोधत असताना आणि स्वत:वरच विनोद करताना दिसला होता. अर्थात या प्रोमोमध्ये कपिलच्या  नव्या को-या शोचे नाव मात्र नव्हते. पण आता स्वत: कपिलने शोचे नाव उघड केले आहे. होय, कपिलच्या या शोचे नाव असणार आहे, ‘फॅमिली विद कपिल शर्मा’. अर्थात हे नाव अद्यापही फायनल नाही. म्हणजे, ऐनवेळी त्यात बदल होण्याचीही शक्यता आहे. या नव्या शोचे स्वरूपही वेगळे राहणार आहे. म्हणजे, वेगवेगळ्या शहरातील लोक या शोमध्ये सामील होऊ शकणार आहेत. 
या शोमध्ये कपिल शर्माची अख्खी जुनी टीम दिसणार आहे. पण सुनील ग्रोव्हरच्या नावावर मात्र अद्यापही सस्पेन्स कायम आहे. कपिल व सुनील ग्रोव्हर पुन्हा एकत्र येणार का, हे अद्याप समजू शकलेले नाही. मार्चच्या अखेरिस हा शो आॅन एअर होण्याची चर्चा आहे. तूर्तास या शोची जोरदार तयारी सुरु आहे. आता हा नवा शो कपिलच्या करिअरची रूळावरून घसरलेल्या गाडीला पुन्हा कसे रूळावर आणतो, ते बघूया.

ALSO READ : करिअर सावरण्यासाठी कपिल शर्माने तयार केला ‘प्लान बी’! वाचा, सविस्तर!!

गतवर्षभरात कपिलच्या करिअरची गाडी रूळावर घसरली होती. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला होता. सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला होता. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला  आजारपणाने  घेरले होते. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले होते.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला होता. यानंतर कपिलने ‘फिरंगी’ हा चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा चित्रपटही जोरात आपटला होता. ‘फिरंगी’च्या अपयशाने कपिल पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेल्याचेही मध्यंतरी ऐकिवात आले होते.  
Web Title: What is the name of Kapil Sharma's new show?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.