What happened that danced on the street, Ankita Lokhande? | ​असे काय झाले की रस्त्यावर नाचत सुटली अंकिता लोखंंडे?

अंकिता लोखंडे सध्या जाम आनंदात आहे. होय, तिचा हा ताजा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल. सध्या अंकिताचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. अंकिताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अंकिता ‘मस्तमौला’ अंदाजात दुबईच्या बॉलिवूड पार्कमध्ये फनी डान्स करताना दिसतेय. कुणाचीही पर्वा न करता अगदी बिनधास्त मूडमध्ये ती नाचतेय. या व्हिडिओत तिच्या चेहºयावरचा आनंद स्पष्ट दिसतोय. आता हा कसला आनंद आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कदाचित बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळतेय याचा किंवा कंगना राणौतसारख्या सुपरस्टार अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळतेय याचा हा आनंद असू शकतो.कंगना राणौत स्टारर ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून अंकिता बॉलिवूड डेब्यू करतेय. या चित्रपटात कंगना राणौत  राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे तर अंकिता राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. 

ALSO READ : ​OMG!! अंकिता लोखंडे म्हणते, मीच ‘मणिकर्णिका’ची हिरोईन!

गतवर्षी अचानक सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या दोघांच्या ब्रेकअपची बातमी येऊन धडकली, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. ब्रेकअपपूर्वी सहा वर्षे सुशांत व अंकिता एकमेकांना डेट करत होते.  ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर भेटलेले हे लव्हबर्ड्स कधीकाळी वेगवेगळ्या वाटांना जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण तसे झाले. अंकिताचा चिडका, संशयी स्वभाव आणि तिचे वाढते दारूचे व्यसन यामुळे सुशांतने तिला सोडल्याची चर्चा यानंतर रंगली होती. क्रिती सॅनन आयुष्यात आल्याने सुशांतने अंकिताला सोडले, अशीही चर्चा होती.  या ब्रेकअपनंतर स्वत:ला सावरणे अंकितासाठी बरेच कठीण गेले. पण आता अंकिता या ब्रेकअपच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलीयं, हे स्पष्ट आहे. त्याशिवाय इतका ‘मस्तमौला’ डान्स शक्यचं नाही. अंकिताचा हा डान्स तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.
Web Title: What happened that danced on the street, Ankita Lokhande?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.