What did this talk about the marriage before the 'Valentine's Day' Yuleia Ventour? | 'व्हॅलेंटाईन डे'च्या आधी लग्नाबाबत हे काय बोलली युलिया वेंतूर

सलमान खानचे फॅन्स त्याच्या लग्नाची वाट अत्यंत आतुरतेने बघतायेत. सलमान खान युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. नुकतेच तिने सलमानसोबत असलेल्या नात्याला घेऊन एक वक्तव्य केले आहे.    

युलियने सलमानसोबत लग्नाबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिले, मला नाही वाटत लग्न करणे गरजेच आहे. जेव्हा दोन लोक प्रेम असतात तेव्हा लग्न करणे गरजेचे नाही. युलिया पुढे म्हणाली मला माझी वेगळी ओळख निर्माण करायची आहे. माझी ओळख फक्त सलमानची गर्लफ्रेंड इतकीच राहायला नको. मी रुमानियामध्ये माझी ओळख निर्माण केली आहे. ''आता मला इथेपण माझी ओळख निर्माण करायची आहे.''  

याआधी यूलिया म्हणाली होती, ''लोक माझा आणि सलमानच्या नात्याचा चुकीचा अर्थ काढतात. मला स्वत:ला पुढच्या आयुष्याबाबत काही माहिती नाही. मला सलमानची खूप इज्जत करते. त्यांने मला गाणं गायला खूप प्रोत्साहित केले.''   

बॉलिवूडमध्ये करिअरबाबत ती म्हणाली, ''मला कधी वाटले सुद्धा नव्हते मी कधी बॉलिवूडचा हिसा बनेन. सलमानच्या बोलण्यावरुन मी हिंदी गाणं गायला सुरुवात केली आणि यात मला यशसुद्धा मिळाले.''
 
युलिया वंतूर आणि मनिष पॉल या दोघांनी एकत्र गायलेले गाणे ‘हरजाई’ अलिकडेच रिलीज झाले आहे. दोघांच्या या गाण्याला प्रचंड पसंत केले जात आहे. यूट्यूबवर या गाण्याला ७ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पसंत केले आहे. सुत्रसंचालक ते गायक अशी कारकीर्द करणारे यूलिया आणि मनिष या गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रचंड खुश आहेत. या रोमँटिक गाण्यात यूलिया आणि मनिष यांनी केवळ गाणे गायलेले नाही तर व्हिडीओत ते अभिनय करतानाही दिसत आहेत. युलिया रोमानियात अभिनय केला आहे मात्र तिला अभिनयाची खूप आवड नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तिला याआधी ही अनेक ऑफर्स मिळल्या आहेत मात्र तिला सध्या गायनावरच लक्षकेंद्रित करायचे आहे. 
Web Title: What did this talk about the marriage before the 'Valentine's Day' Yuleia Ventour?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.