What did not happen in Shatrughan Sinha and 23 years in the line was done by wife Poonam Sinha at a party! | शत्रुघ्न सिन्हा अन् रेखामध्ये २३ वर्षांत जे घडले नाही ते एका पार्टीत पत्नी पूनम सिन्हाने केले !

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आणि शॉटगन या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दोघेही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार असून, त्यांनी बºयाचशा हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. परंतु १९८८ नंतर हे दोघे सुपरस्टार कधीही एकत्र बघावयास मिळाले नाहीत. १९८८ मध्ये रिलीज झालेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी एकत्र काम केले होते. पुढे या दोघांनी एकमेकांशी बोलणेदेखील बंद केले होते. हा सिलसिला तब्बल २३ वर्षे सुरू राहिला. मात्र अचानकच असे काही घडले की, हे दोघे पुन्हा एकदा चांगले मित्र झाले. 

त्याचे झाले असे की, ‘खून भरी मांग’ रिलीज होण्याअगोदर शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यात वादावादी होण्यास सुरुवात झाली होती. १९८७ मध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कुठल्या तरी गोष्टीवरून दोघांमध्ये चांगलेच कडाक्याचे भांडण झाले होते. विशेष म्हणजे, यावेळी निर्माता राकेश रोशन यांना दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागली. राकेश रोशन यांनी दोन्ही स्टार्सना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे राकेश रोशन यांचा चांगलेच टेन्शन आले होते. कारण त्यांना अशी भीती वाटत होती की, या दोघांच्या वादात चित्रपट अर्धवटच राहील. परंतु शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांनी एक निर्णय घेतला, तो निर्णय म्हणजे जोपर्यंत चित्रपटाची शूटिंग पूर्ण होणार नाही, तोपर्यंत ते एकमेकांसोबत बोलणार नाहीत. 

हा सिलसिला तब्बल २३ वर्षे सुरू राहिला. या काळात शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा कधीच एकमेकांशी बोलले नाहीत. मात्र ही बाब शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांना फारशी चांगली वाटत नव्हती. २३ वर्षांनंतर जेव्हा रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा एका पार्टीत पोहोचले होते, तेव्हा पूनम यांनी मध्यस्थी करीत दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्री निर्माण केली. पूनम यांनी शत्रुघ्न आणि रेखा यांच्यात असलेले सर्व गैरसमज दूर केले. दोघांच्या या नव्याने झालेल्या मैत्रीचा परिणाम असा झाला की, जेव्हा शत्रुघ्न यांनी मुलगा लव सिन्हा याला ‘सदियां’ या चित्रपटातून लॉन्च केले तेव्हा या चित्रपटात रेखा यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती. 
Web Title: What did not happen in Shatrughan Sinha and 23 years in the line was done by wife Poonam Sinha at a party!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.