What did Jaya Bachchan say like Karisma Kapoor, who heard Abhishek Bachchan broke his heart? | जया बच्चन करिश्मा कपूरल्या असे काय म्हणाल्या, जे ऐकून अभिषेक बच्चनने मोडला साखरपुडा ?

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वार्या राय यांची जोडी बी-टाऊनमधील सगळ्यात चर्चेचीत जोड्यांपैकी एक आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का अभिषेकची पहिली पसंती ऐश्वर्या नाही तर करिश्मा कपूर होती. 2002 साली आलेल्या 'हां मैंने भी प्यार किया' चित्रपटाच्या दरम्यान दोघे एकमेकांच्याजवळ आले. अभिषेक आणि-करिश्मा एकमेकांना लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. 2000 मध्ये आलेल्या रिफ्यूजी चित्रपटात अभिषेकच्या अपोझिट करिश्माची लहान बहिण करीना कपूर खान होती. त्यावेळी रिफ्जूच्या सेटवर करिश्मा यायची. तिथूनच त्याच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. दोघे एकमेकांवर पसंत करायला लागले. बच्चन आणि कपूर कुटुंबीयांना याबाबत माहिती होती. दोन्ही कुटुंबीयांचे म्हणणे होते की दोघांनी लवकरात लवकर लग्नाच्या बेडीत अडकावे. 2002मध्ये अमिताभ यांच्या वाढदिवसाला दोघांनी साखरपुडा देखील केला. मात्र यानंतर दोघांच्या नात्यामध्ये हळूहळू दुरावा यायला लागला. मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या नात्यामधील भांडणाचे कारण अभिषेकची आई जया बच्चन होत्या.
जया बच्चन यांचे म्हणणे होते की बच्चन कुटुंबाच्या सूनेने लग्नानंतर चित्रपटात काम करु नये. मात्र जया यांची हि अट करिश्मा कपूरला मान्य नव्हती. करिश्माने या गोष्टीस साफ नकार दिला. लग्ननंतर ही करिश्माला चित्रपटात काम करायचे होते. याकारणामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये दरी निर्माण झाली आणि शेवटी हे नातं इथेच संपुष्टात आले. अभिषेकचे आईवर खूप प्रेम होते त्यामुळे याप्रकरणात तो काहीच बोलला नाही.   

ALSO RAED : म्हणून अभिषेक बच्चनची हिरोईन बनण्यास प्रियांका चोप्राने दिला नकार?

यानंतर 2003मध्ये करिश्माने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. मात्र हे लग्न फारकाळ टिकू शकले नाही. 2013मध्ये करिश्माने संजयपासून घटस्फोट घेतला. तिकडे अभिषेकच्या आयुष्यात करिश्मानंतर ऐश्वर्या राय आली होती. गुरुच्या सेटवर त्यांचे प्रेम फुललण्यास सुरुवात झाली. 2007 साली दोघे लग्न बंधनात अडकले. अभिषेक आणि ऐश्वर्याला आराध्या नावाची मुलगी सुद्धा आहे. अभिषेक लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या गुस्ताखियाँ चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट साहिर लुधीयानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेम काहाणीवर आधारित आहे. 
Web Title: What did Jaya Bachchan say like Karisma Kapoor, who heard Abhishek Bachchan broke his heart?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.