What are you doing in 'Lad' Market in Hyderabad? | हैदराबादेतील लाड मार्केटमध्ये काय करताहेत ‘या’ सेलिब्रिटी मायलेकी?

सारा अली खान सध्या तिच्या ‘सिम्बा’ या दुस-या चित्रपटात बिझी आहे. अलीकडे या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो समोर आले होते. पण आता साराचे ताजे फोटो बघून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जी लवकरचं चित्रपटांत दिसणार आहे, ती हीच सारा का? असा प्रश्न तुम्हाला तिचे हे फोटो पाहिल्यानंतर पडेल. होय, सारा व तिची आई अमृता दोघेही हैदराबादेतील एका बाजारात खरेदी करत असताना यात दिसत आहेत.हैदराबादेतील  लाड मार्केट लोकप्रीय आहे. या बाजारात सारा तिच्या आईसोबत एका ठेल्यावर ज्वेलरी खरेदी करताना दिसली.आजूबाजुला प्रचंड गर्दी असूनही या दोघी मायलेकी अगदी निवांत खरेदी करताहेत. आपल्या कुणी ओळखो, ना ओळखो, याची कदाचित दोघींनाही चिंता नाही.

ALSO READ : गरीब वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सारा अली खानला यूजर्सनी सुनावले, पाहा व्हिडीओ!

काही दिवसांपूर्वी सारा एका कायदेशीर वादात सापडली होती. कारण होते, ‘केदारनाथ’चा दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि ‘सिम्बा’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी या दोघांना एकच शूटींग डेट्स दिल्याचे. या प्रकरणातून साराला बाहेर काढण्यासाठी तिचा डॅड सैफ अली खानही मैदानात उतरला होता. खबर खरी मानाल तर ‘केदारनाथ’च्या निर्मात्यांनी साराविरोधात कोर्टात धाव घेत, पाच कोटी रूपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. ‘केदारनाथ’च्या निर्मात्यांनी केलेल्या दाव्यानुसार, साराने आधी ‘केदारनाथ’ला जून व जुलैमधील डेट्स दिल्या होत्या. पण अभिषेक कपूर व प्रेरणा अरोरा यांच्यातील वादानंतर याच डेट्स तिने रोहित शेट्टींच्या ‘सिम्बा’ला दिल्यात. काही दिवसानंतर ‘केदारनाथ’च्या निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवालाने आपल्या खांद्यावर घेतली आणि साराच्या डेट्स मिळत नसल्याचे पाहून तिला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला. पण आता   हा वाद कोर्टाबाहेरचं निकाली निघाला आहे. अभिषेक कपूर आणि रोहित शेट्टी यांनी हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचा निर्णय घेतला आहे, यासंदर्भात नुकतीच रोहित व अभिषेक यांच्यात एक मीटिंग झाल्याचेही कळतेय. प्राप्त माहितीनुसार, आता साराला ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’चे शूटींग सोबत सोबत करावी लागेल आणि रोहित व अभिषेकला याबद्दल कुठलीही तक्रार नसेल.
Web Title: What are you doing in 'Lad' Market in Hyderabad?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.