What is Abola in Salman and Kabir? | ​सलमान व कबीरमध्ये अबोला का ?

अभिनेता सलमान खान  आणि दिग्दर्शक कबीर खान यांची मैत्री सगळ्या बॉलिवूडला माहिती आहे. पण सध्या या दोघांमध्येही बिनसल्याची बातमी आहे. चर्चेवर विश्वास ठेवाल तर, दोघांनीही एकमेकांशी अबोला धरला आहे.  यानंतर कधीही कबीर खानसोबत काम न करण्याचा निर्णय सलमानने घेतला असल्याचेही ऐकिवात येत आहे. सलमान सध्या कबीरच्या ‘ट्युबलाईट’ या सिनेमाचे शूटींग करतोय. एका वृत्तानुसार, दोघांमध्ये काही कारणांवरून मतभेद निर्माण झाले आहे. सलमान काही बोलतो, ते कबीरला आवडत नाही आणि कबीर काही बोलतो ते सलमानला पटत नाही, असे एकंदर सेटवरचे वातावरण आहे. आता या मतभेदामागचे कारण काय? तर तेही समोर आले आहे. खरे सांगायचे तर कबीर सलमानच्या एका सवयीमुळे संतापला आहे. वैतागला आहे. होय, चित्रपटाचे शूटींग संपले रे संपले की, सलमान क्रू मेंबर्ससोबत ड्रिंक करायला बसतो. सलमान तर या मैफिलीतून लवकर निघून झोपायला जातो. मात्र तो गेल्यानंतरही ही मैफिल रात्री उशीरापर्यंत रंगते. याचा परिणाम म्हणजे, दुस-यादिवशी कू्र मेंबर्स उशीरा सेटवर पोहोचतात. यामुळे शूटींगचा खोळंबा होतो. सलमानचे हे वागणेच कबीरला खटकते आहे. यासंदर्भात त्याने सलमानशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. खरे तर कबीरने सलमानसोबतच्या भांडणाची ही बातमी एकदम बकवास असल्याचे म्हटले आहे. आता खरे काय, ते माहित नाही. कबीर म्हणतो ते खरे असेल तर सलमान व कबीर ही जोडी भविष्यातही काम करताना दिसेल आणि तसे नसेल तर तेही उघड होईलच.
सलमान व कबीर खान यांनी ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहे. ‘ट्यूबलाईट’ हा चित्रपट भारत व चीनमधील १९६९ च्या युद्धावर आधारित आहे. सलमान या चित्रपटात एका भारतीय जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.  
Web Title: What is Abola in Salman and Kabir?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.