'We like to accept challenges' | ‘आव्हानं स्विकारायला आम्हाला आवडतं’

हर्ष पाठक
  
यूलिया वंतूर आणि मनिष पॉल या दोघांनी एकत्र गायलेले गाणे ‘हरजाई’ अलिकडेच रिलीज झाले आहे. दोघांच्या या गाण्याला प्रचंड पसंत केले जात आहे. यूट्यूबवर या गाण्याला ७ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पसंत केले आहे. सुत्रसंचालक ते गायक अशी कारकीर्द करणारे यूलिया आणि मनिष या गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रचंड खुश आहेत. या रोमँटिक गाण्यात यूलिया आणि मनिष यांनी केवळ गाणे गायलेले नाही तर व्हिडीओत ते अभिनय करतानाही दिसत आहेत. याविषयी दोघांसोबतही मारलेल्या या गप्पा....

* तुमचे ‘हरजाई’ हे गाणे हिट झाले आहे. एवढे यश मिळेल अशी अपेक्षा होती का? 
- याविषयी बोलताना मनिष म्हणाला,‘गाणे एवढे हिट होईल अशी अपेक्षा नव्हती. मला गाण्याच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया मिळत होत्या. माझे मित्र म्हणाले की, उगीच रिस्क घेऊ नकोस. परंतु, मी माझे गाण्याच्याप्रती असलेले पॅशन सोडलेले नाही. गाण्याला आणि व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आमची संपूर्ण टीम प्रचंड खुश आहे.

* या गाण्याला मिळालेली आत्तापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट?
 - या प्रश्नाचे उत्तर देताना मनिष म्हणाला,‘ अमिताभ बच्चन यांनी या गाण्यासाठी टिवट केले असून मी जाम खुश आहे. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. त्यांनी पाठिंबा दिला ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.’ याशिवाय यूलिया तिचा अनुभव शेअर करताना म्हणाली,‘ या गाण्यात एका ठिकाणी मी रडते. मला रडताना बघून आमच्या स्टाफ मेंबरने म्हटले की, विनंती आहे पण पुन्हा रडू नकात.’ मला वाटतं माझ्यासाठी ती बेस्ट कॉम्प्लिमेंट होती.

* यूलिया, तू हिमेश यांच्यासोबत गाणार होती. परंतु, मनिष जर बॅकग्राऊंडला गाण्यासाठी आला नसता तर तू कॉन्फिडंट होतीस का? 
- होय, कारण आम्ही दोघेही जण एकाच बॅकग्राऊंडमधून आला आहोत. आम्ही दोघेही सुत्रसंचालक आहोत. आम्हा दोघांत बरंचसं साम्य आहे. मला गाणं आवडलं त्यामुळे मी मनिषसोबत काम केलं.

* मनिष, युलिया ही प्रसिद्ध गायक नाही. परंतु, तरी तुला हा प्रोजेक्ट आव्हानात्मक वाटला नाही का?
- मला आव्हाने स्विकारायला प्रचंड आवडतं. मी आत्तापर्यंत माझ्या करिअरमध्ये अनेक रिस्क्स घेतल्या आहेत. जेव्हा मला सलमानने पाठिंबा दिला तेव्हा माझ्यांत आत्मविश्वास अजून बळावला. खरंतर, यूलिया ही एक उत्कृष्ट गायिका आहे. त्याशिवाय एक उत्कृष्ट अभिनेत्री देखील आहे. आमचा रोमँटिक अंदाज लोकांना बराच आवडताना दिसतोय. 

* यूलिया, तू आम्हाला अभिनय करतानाही दिसशील का?
- नाही, मी रोमानियात बरंच काम केले आहे. परंतु, मला अभिनयाची फार काही आवड नाही. मला अनेक आॅफर्स याअगोदरही मिळाल्या आहे. परंतु, सध्या तरी मी माझ्या गायनावरच लक्षकेंद्रित करू इच्छिते.

* यूलिया, तुझा फेव्हरेट अभिनेता आणि अभिनेत्री कोण आहे?
- अनुपम खेर. ते आमच्या म्युझिक लाँचच्यावेळी आले होते. ते खरंच एक उत्तम अभिनेता आणि एक चांगले व्यक्तीही आहेत. प्रियांका चोप्रा ही देखील मला खूप आवडते. जेव्हा मी इंडस्ट्रीत इतर हिरोईन्सना जेव्हा ओळखत नव्हते तेव्हा प्रियांकाच मला खूप आवडायची. ती प्रत्येक दिवस स्वत:मध्ये बदल घडवत आहे. अमेरिके त ती स्वत:चे नाव ज्याप्रकारे बनवत आहे ते बघून मला प्रचंड गर्व वाटतो. मी प्रियांकाची मोठी प्रशंसक आहे.

* तुम्ही सलमान खानसोबतही गाणे गायले आहे. आगामी काळात आम्ही तुम्हाला एकत्र गाताना बघू शकतो का?
- यूलिया म्हणते, का नाही? त्यांच्यासोबत गाणं हा माझ्यासाठी खरंतर सन्मान आणि आनंद वाटणारी गोष्ट असेल. आम्ही याअगोदरही एकत्र काम केले आहे. परंतु, मला पुन्हा संधी मिळाली तर नक्कीच काम करायला आवडेल.


">http://
Web Title: 'We like to accept challenges'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.