Watch: Watch the trailer of the 'Golmaal Again' starring a comedy and horror! | watch : ​कॉमेडी अन् हॉररचा तडका असलेला ‘गोलमाल अगेन’चा ट्रेलर पाहाच!

‘गोलमाल’ सीरिजचा पुढचा चित्रपट ‘गोलमाल अगेन’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘गोलमाल अगेन’चा ट्रेलर आऊट झालाय. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या हा चित्रपट ‘गोलमाल’ सीरिजमधील चौथा चित्रपट आहे. यापूर्वी या सीरिजमधील तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे रोहित शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ‘गोलमाल अगेन’च्या रूपात एक नवा सिनेमा घेऊन येतोय.कालच या चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले होते. यानंतर आज ट्रेलर रिलीज केला गेला. हा ट्रेलर म्हणजे कॉमेडी आणि हॉररचा तडका आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दीर्घकाळानंतर जॉनी लिव्हरची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.  आधीसारखीच ‘भुल्लकड’ची व्यक्तिरेखा तो साकारताना दिसतोय.  अजय देवगण आणि श्रेयस तळपदे यांच्या एन्ट्रीने ट्रेलरची सुुरुवात होते. त्या रूममध्ये भूत आहे, असे अजय त्याला म्हणताना दिसतोय. रोहितच्या प्रत्येक चित्रपटात कार असतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही गाड्यांचा शानदार वापर झालेला दिसत आहेत. अजय दोन गाड्यांवर उभा आहे आणि बरोबर संतुलन साधतोय, असे एक दृश्य यात आहे. कॉमेडी शिवाय भूत आणि आत्मा यांचे गजब मिश्रण असलेला हा ट्रेलर पाहून तुम्ही खळाळून हसाल, इतके मात्र रोहित शेट्टीने या ट्रेलरमधून नक्कीच साधलेय. हा ट्रेलर तुम्ही बघायला हवायं. तेव्हा बघा आणि कसा वाटला, हे आम्हाला कळवा.

ALSO READ : ‘गोलमाल अगेन’ मधील भूमिकेविषयी परिणिती चोपडाने केला मोठा खुलासा!

अभिनेत्री तब्बू या चित्रपटात कॉमेडी करताना दिसणार आहे. होय,  ‘गोलमाल अगेन’मध्ये करिना कपूरच्या जागी तब्बूची वर्णी लागली आहे. सोबत अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू , परिणीती चोप्रा अशा सगळ्यांची साथ आहेच. गोलमाल सीरीजमधला पहिला चित्रपट गोलमाल २००६मध्ये आला होता.  त्यानंतर प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतरान ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल 3’ आला होता. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर रोहित शेट्टी गोलमाल 4 हा चित्रपट घेऊन येतो आहे.  येत्या आक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार असल्याचे समजतेय. 
Web Title: Watch: Watch the trailer of the 'Golmaal Again' starring a comedy and horror!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.