WATCH Video : राखी सावंत बरळली, म्हणे, तनुश्री दत्ताच्या म्हणण्यावरून ‘त्या’ रेसलरने मला मारले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:42 PM2018-11-13T12:42:52+5:302018-11-13T12:44:44+5:30

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतला अमेरिकन रेसलरला आव्हान देणे महागात पडले. यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले.आता राखीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती इंडियन रेसलर खलीसोबत दिसतेय. व्हिडिओत नेहमीप्रमाणे राखी भलतेच काही बरळताना दिसतेय.

WATCH Video: raki sawant blames tanushree dutta for attack by american wrestler viral video | WATCH Video : राखी सावंत बरळली, म्हणे, तनुश्री दत्ताच्या म्हणण्यावरून ‘त्या’ रेसलरने मला मारले!!

WATCH Video : राखी सावंत बरळली, म्हणे, तनुश्री दत्ताच्या म्हणण्यावरून ‘त्या’ रेसलरने मला मारले!!

googlenewsNext
ठळक मुद्देव्हिडिओत नेहमीप्रमाणे राखी भलतेच काही बरळताना दिसतेय. होय, जे काही झाले ते सगळे तनुश्री दत्ताच्या म्हणण्यावरून झाले, असे राखीने म्हटलेय. आता मी तनुश्रीला सोडणार नाही आणि त्या अमेरिकन रेसलरला तर मी अमेरिकेत जावून मारेल, असे राखी म्हणाली.

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतला अमेरिकन रेसलरला आव्हान देणे महागात पडले.   यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले.   हरियाणातील पंचकुला येथे आयोजित कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रंगलेल्या रेसलिंगच्या बिग फाईटमध्येविदेशी महिला रेसलरला इतका राग आला की, तिने राखीची हवेत उचलून थेट जमिनीवर आपटले. यानंतर राखीला थेट रूग्णालयात हलवावे लागले. आता राखीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती इंडियन रेसलर खलीसोबत दिसतेय. व्हिडिओत नेहमीप्रमाणे राखी भलतेच काही बरळताना दिसतेय. होय, जे काही झाले ते सगळे तनुश्री दत्ताच्या म्हणण्यावरून झाले, असे राखीने म्हटलेय. होय, हे सगळे तनुश्रीने घडवून आणले. मी डान्स करूच नये, असे तनुश्रीला वाटते. त्यामुळे अमेरिकन रेसलरला पैसे देऊन तिने माझी कंबर मोडली. मी रिंगमध्ये डान्स करण्यासाठी गेली होती. पण ती रेसलर पागल झाली आणि तिने मला जमिनीवर आदळले. मी तर रेसलर नाही, असे तिने म्हटले आहे.


इंटनॅशनल बिझनेस टाईम्सशी बोलताना राखी सावंतने तनुश्रीशिवाय हनीप्रीत व गुरूमीत राम रहिमवरही आरोप केलेत. तनुश्रीसोबत हनीप्रीत व गुरमीत राम रहिम हे दोघेही माझ्यासोबत गेम खेळत आहेत, असे ती म्हणाली.
एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही, राखीने तनुश्रीला लक्ष्य केले. आधी तनुश्रीने अमेरिकेत जावून माझे नाव खराब केले. आता या रेसलरने मला भारतात येऊन मारले. मी काही फाईट करायला गेले नव्हते. आता मी तनुश्रीला सोडणार नाही आणि त्या अमेरिकन रेसलरला तर मी अमेरिकेत जावून मारेल, असे राखी म्हणाली.


रैवलने फाईट जिंकल्यानंतर ओपन चॅलेंज दिले. कुण्या भारतीय महिलेत दम असेल तर तिने माझ्याशी लढावे, असे ती म्हणाली. तिचे हे आव्हान राखीने स्वीकारले आणि  तुझ्यात दम असेल तर तू माझ्यासारखे नाचून दाखव, असे प्रतिआव्हान तिला दिले. यानंतर दोघांमध्येही लढत सुरू झाली.

लोक राखीच्या लटक्या-झटक्यांवर फिदा होत, तिला चीअरअप करत होते. यादरम्यान काही लोकांनी विदेशी रेसलरला ठेंगा दाखवला. राखीही विदेशी रेसलरला डिवचतांना दिसली. हे सगळे पाहून विदेशी रेसलर रैवल चांगलीच संतापली आणि काही कळायच्या आत तिने राखीला अक्षरश: हवेत उचलून खाली पटकले. यानंतर राखी जोरात ओरडायला लागली. बाजूला उभे बाऊन्सर रिंगच्या आत आले आणि त्यांनी राखीला कसेबसे उठवले. राखीला पाठीत आणि पोटातील वेदना असह्य झाल्यात. यानंतर तिला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले.
   

Web Title: WATCH Video: raki sawant blames tanushree dutta for attack by american wrestler viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.