Watch video: Land Ranveer Singh And Mago In The Pedenakar Toilet ... !! | watch video​ : भूमी पेडणेकरच्या टॉयलेटमध्ये शिरला रणवीर सिंह अन् मग....!!

होय,  रणवीर सिंह अचानक अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या टॉयलेटमध्ये शिरला अन् मग....हे शीर्षक अगदी बरोबर आहे. पण थांबा...थांबा...तुम्ही जे समजताय, तसे मात्र नक्कीच नाही. खरे सांगायचे तर सध्या प्रत्येकाला  अक्षय कुमार व भूमी पेडणेकर स्टारर ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’चा ज्वर चढलाय. रणवीर सिंह हा सुद्धा यातलाच. त्याचमुळेच त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. एकंदर काय तर रणवीरचा हा व्हिडिओ एक प्रमोशन फंडा आहे. अधिकाधिक लोकांना ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ पाहण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा रणवीरचा उद्देश आहे.या व्हिडिओत रणवीर आणि भूमी दोघेही दिसत आहेत. रणवीर एका खोलीतील टॉयलेटचा वापर करतो. अचानक या खोलीत भूमी येते. कारण ती खोली तिची असते. पण टॉयलेटमध्ये कुणीतरी गेल्याचे तिच्या लक्षात येते. त्याचवेळी रणवीर टॉयलेटमधून बाहेर येतो. आपल्या देशात टॉयलेटची इतकी कमतरता आहे की, मला तुझे टॉयलेट वापरावे लागले, असे तो तिला म्हणतो.हा व्हिडिओ पाहून हसून हसून तुमचे पोट दुखेल. पण सोबत, आपल्या देशात टॉयलेटच्या कमतरतेमुळे लोकांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते, हेही तुम्हाला कळेल. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला जरूर कळवा.
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अक्षय व भूमी ही जोडी प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय व भूमी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार आहेत. सोबतच घरात शौचालय असणे किती गरजेचे आहे, हा संदेशही देणार आहे. {{{{twitter_post_id####}}}}
Web Title: Watch video: Land Ranveer Singh And Mago In The Pedenakar Toilet ... !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.